Tuesday, September 15, 2026
Homeभद्रावतीटपरी आहे, दुकान आहे; पण खर्रा कुठे?..तात्यांना पुडी थेट खिशातून!

टपरी आहे, दुकान आहे; पण खर्रा कुठे?..तात्यांना पुडी थेट खिशातून!

भद्रावतीचा ‘फेमस खर्रा’ भाग…३ ; टपरी आहे, खर्रा मात्र खिशात!

बिस्किटच्या दुकानाजवळ स्कूटीची ये-जा; घरून पुड्या आणून खिशातून ‘गुप्त विक्री’? तात्यांचा सवाल..“हा खर्रा की खिशातील व्यवसाय?”

भद्रावती, न्यूज डेस्क…

भद्रावतीतील टप्पा चौक म्हटला की तात्यांच्या आठवणीत जुन्या खर्रा टपरीचे दिवस जागे होतात. पूर्वी टपरीवर बसून सरळ आवाज यायचा

“भाऊ, एक खर्रा द्या!”

मात्र आता कथानक बदलले आहे.

टपरीच्या जागी बिस्किटचे दुकान, रस्त्यावर अधूनमधून मोपेड-स्कूटीची ये-जा आणि खर्रा मात्र दुकानात उघडपणे न ठेवता खिशातून बाहेर काढून देण्याचा गमतीदार प्रकार तात्यांच्या नजरेस पडतो.

तात्या आश्चर्याने विचारतात…

तात्या …“अरे, टप्पा चौकात टपरी कुठे गेली?”

बिस्किटवाला …“तात्या, आता जमाना बदलला!”

तात्या ….“मग खर्रा?”

दुकानदार हळू आवाजात

“तो दुकानात नाही… खिशात!”

तात्या कपाळावर हात मारतात.

तात्या …“म्हणजे आता टप्पा चौकात खर्रा टपरीवर नाही, थेट खिशातून मिळतोय?”

खिशातून पुडी… तात्यांसमोर थेट ‘गुप्त व्यवहार’!

तेवढ्यात कथानकातील एक ग्राहक टप्पा चौकात येतो. आजूबाजूला नजर फिरवतो आणि हळूच विचारतो

“भाऊ… आहे का?”

समोरचा पात्रही आवाज कमी करून म्हणतो

“काय?”

ग्राहक

“तोच… खर्रा!”

क्षणभर इकडे-तिकडे पाहिले जाते.

मग खिशात हात जातो… आणि खिशातून खर्र्याची पुडी बाहेर!

तात्या हे दृश्य पाहून म्हणतात

“अरे बापरे! टप्पा चौकात खर्रा विक्रीचा हा नवा अध्याय आहे की काय? दुकानात बिस्किटं आणि खिशात खर्रा!”

घरून आणतो, खिशात ठेवतो आणि मागणी आली की देतो?

कथानकातील पात्र सांगते…

“तात्या, आता सगळं उघड्यावर कशाला ठेवायचं? गरज पडली की घरून आणायचं… खिशात ठेवायचं… आणि मागणी आली की द्यायचं!”

तात्या मिश्कीलपणे म्हणतात…

“मग दुकानाचा व्यवसाय बिस्किटांचा आणि खिशाचा व्यवसाय खर्र्याचा?”

तात्यांच्या या प्रश्नावर मात्र सगळे शांत!

टप्पा चौकातील ‘खर्रा रहस्य’ कायम!

तात्यांना आता एकच प्रश्न सतावत आहे…

टपरी गायब झाली, बिस्किटचे दुकान आले; स्कूटीवरून ये-जा वाढली आणि खर्रा थेट खिशातून बाहेर पडू लागला…

तात्या शेवटी म्हणतात…

“खर्रा बंद झाला म्हणायचा की फक्त त्याने टपरी सोडून खिशात घर केलं?”

क्रमश;…

तात्यांचा टप्पा चौकातील ‘खिशातील खर्रा’ शोध अजून सुरूच आहे!

टीप :- प्रस्तुत लेखन हे काल्पनिक, विनोदी व व्यंगात्मक स्वरूपातील कथानक आहे. यातील पात्रे, प्रसंग व संवाद हे मनोरंजनाच्या उद्देशाने रचलेले आहेत. कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, दुकान, वाहन किंवा व्यवसायावर प्रत्यक्ष आरोप करण्याचा हेतू नाही. प्रत्यक्ष नियमबाह्य विक्री आढळल्यास संबंधित प्रशासनाने नियमानुसार तपास व कारवाई करणे अपेक्षित आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!