Tuesday, September 15, 2026
Homeभद्रावतीस्ट्रीट लाईट बंद ठेवणे पडणार महागात; इम्रान खानांनी दिला आंदोलनाचा इशारा!

स्ट्रीट लाईट बंद ठेवणे पडणार महागात; इम्रान खानांनी दिला आंदोलनाचा इशारा!

गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी संताजी नगर अंधारात; इम्रान खानांचा नगरपरिषदेला थेट इशारा!

भद्रावती , न्यूज डेस्क

गणेशोत्सवाला सुरुवात होत असतानाच भद्रावती नगरपरिषद क्षेत्रातील संताजी नगर प्रभागातील स्ट्रीट लाईट काल रात्री बंद असल्याचा प्रकार समोर आला. सणासुदीच्या काळात नागरिकांची मोठी वर्दळ असताना परिसर अंधारात राहिल्याने नगरपरिषद विद्युत विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

स्ट्रीट लाईट बंद असल्याची माहिती मिळाल्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाचे इम्रान खान यांनी संबंधित विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, फोन करूनही संबंधित कर्मचारी फोन उचलत नसल्याचा आरोप इम्रान खान यांनी केला आहे.

गणेशोत्सवाच्या काळात नागरिक, महिला, मुले व भाविकांची रात्री मोठी वर्दळ असते. अशा वेळी स्ट्रीट लाईट बंद असणे ही गंभीर बाब आहे. नागरिकांच्या समस्येची माहिती देण्यासाठी फोन केल्यानंतरही कर्मचारी प्रतिसाद देत नसेल, तर तक्रार नेमकी कुणाकडे करायची? असा सवाल इम्रान खान यांनी उपस्थित केला.

   “गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी रात्रोला नागरिकांना अंधारात ठेवणे खपवून घेतले जाणार नाही. नगरपरिषद प्रशासनाने तातडीने स्ट्रीट लाईट सुरू कराव्यात. संबंधित विभागाने नागरिकांच्या फोनला प्रतिसाद देणेही अपेक्षित आहे,” असा रोखठोक इशारा इम्रान खान यांनी दिला.

उद्यापासून संताजी नगरातील स्ट्रीट लाईट नियमित सुरू न झाल्यास भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे.

आता इम्रान खान यांच्या इशाऱ्यानंतर नगरपरिषद प्रशासन जागे होते की आंदोलनाची वेळ येते, याकडे संताजी नगरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!