Wednesday, September 16, 2026
Homeभद्रावतीभद्रावती पोलीस अधिकारी सचिन खेत्रे साहेबांच्या कारवाईची जोरदार चर्चा!

भद्रावती पोलीस अधिकारी सचिन खेत्रे साहेबांच्या कारवाईची जोरदार चर्चा!

३७ दिवसांत अंदाजे १५० हून अधिक कारवाया; भद्रावतीत नेमकं बदललं काय?

जुगार-सट्टा, अवैध दारू, गांजा अन् इतर गैरप्रकारांविरोधात कारवाई; एवढ्या मोठ्या संख्येने कारवाया होणे हा विचार करण्यासारखा मुद्दा

भद्रावती, न्यूज डेस्क,  शंकर बोरघरे, 95 52 61 25 55 

मंडळी…. १० ऑगस्ट २०२६ रोजी पोलिस अधीकारी सचिन खेत्रे साहेबांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या ३७ दिवसांत भद्रावती शहर व तालुक्यात पोलिसांकडून अंदाजे १५० हून अधिक कारवाया झाल्याची माहिती समोर येत आहे. जुगार-सट्टा, अवैध दारू, गांजा, गांजा सेवन तसेच खर्रा-तंबाखू विक्रीसह विविध गैरप्रकारांविरोधात कारवाई करण्यात आल्याचे समोर येत आहे. या कारवाईमुळे पोलिसांच्या कामकाजात वेग आल्याचे चित्र दिसत असले, तरी एवढ्या मोठ्या संख्येने कारवाया होणे हा देखील विचार करण्यासारखा मुद्दा ठरत आहे.

       कारवाई होणे ही कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने नियमित प्रक्रिया असली, तरी अल्प कालावधीत इतक्या मोठ्या प्रमाणावर कारवायांची माहिती समोर येत असेल तर संबंधित गैरप्रकारांवर सातत्याने लक्ष ठेवण्याची गरज स्पष्ट होते. हे प्रकार यापूर्वी कितपत होते, त्याबाबत प्रशासनाच्या नोंदी काय सांगतात आणि पुढील काळात त्यावर किती प्रभावी नियंत्रण राहते, याकडे आता लक्ष लागले आहे.

पोलीस अधिकारी सचिन खेत्रे साहेबांचा  नेतृत्वाखाली सुरू असलेल्या कारवाईत विविध ठिकाणी छापे, जप्ती आणि कायदेशीर कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, तक्रारीची प्रतीक्षा करण्याऐवजी मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाई करण्यावर भर दिला जात.   असल्याचे दिसून येते.

       मात्र अशा धडक कारवाया केवळ काही दिवसांपुरत्या मर्यादित न राहता सातत्याने सुरू राहिल्या, तरच त्याचा दीर्घकालीन परिणाम स्पष्ट होऊ शकतो. आज कारवाई झाल्यानंतर संबंधित प्रकार पुन्हा होऊ नयेत, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि नियमित गस्त यांनाही तितकेच महत्त्व आहे.

अंदाजे १५० हून अधिक कारवायांचा हा आकडा उपलब्ध माहितीनुसार आहे; अधिकृत नोंदींनुसार त्यात बदल होऊ शकतो. त्यामुळे या कारवायांकडे केवळ संख्येच्या दृष्टीने न पाहता, भद्रावतीतील कायदा-सुव्यवस्था आणि अवैध प्रकारांवर नियंत्रणाच्या व्यापक चित्रातून पाहणे आवश्यक आहे.

      कारवाईचा वेग वाढला आहे, हे चित्र स्पष्ट आहे. आता ही मोहीम किती सातत्याने सुरू राहते, पुढे कोणत्या प्रकारांवर कारवाई होते आणि या कारवायांमुळे प्रत्यक्षात काय बदल घडतो, याकडे नागरिकांचे लक्ष आहे.

कारवाई सुरू आहे… पण आता खरा सवाल एकच  पुढचा नंबर कोणाचा?

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!