अनुज संजय महाजनकडून तीन धारदार शस्त्रे जप्त; भद्रावती पोलिसांची मोठी कारवाई
कुंभारखेडी सुरक्षा नगरातील घरझडतीत दोन तलवारी व खंजर जप्त; ९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात
भद्रावती , न्यूज डेस्क शंकर बोरघरे 95 52 61 25 55
कुंभारखेडी सुरक्षा नगर परिसरात धारदार शस्त्रे असल्याची माहिती मिळाल्यानंतर भद्रावती पोलिसांनी कारवाई करीत अनुज संजय महाजन (वय १९, रा. कुंभारखेडी सुरक्षा नगर, भद्रावती) याच्या घराची झडती घेतली. या झडतीदरम्यान पोलिसांना दोन जुनी तलवारी आणि एक खंजर आढळून आले. पंचनामा करून सदर शस्त्रे जप्त करण्यात आली असून जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ९ हजार ५०० रुपये आहे.
सदर माहीती अधिकृत पोलीस सूत्रांकडून मीळालेल्या माहितीनुसार आहेत
ही कारवाई १४ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २.३० ते ३.३० वाजताच्या सुमारास कुंभारखेडी सुरक्षा नगर, भद्रावती येथे करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिस पथक व पंच घटनास्थळी दाखल झाले. घराची झडती घेतली असता पहिल्या खोलीमध्ये सदर धारदार शस्त्रे आढळून आली.
जप्त केलेल्या शस्त्रांमध्ये ८७ सेंटीमीटर लांबीची एक जुनी वापरलेली तलवार, ७० सेंटीमीटर लांबीची दुसरी जुनी वापरलेली तलवार तसेच ३० सेंटीमीटर लांबीचा जुना वापरलेला खंजर यांचा समावेश आहे. या तिन्ही शस्त्रांची एकत्रित अंदाजे किंमत ९ हजार ५०० रूपयांचा असल्याचे पोलिस अहवालात नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी गुन्हा क्रमांक ९२२/२०२६ नोंदविण्यात आला असून भारतीय हत्यार कायदा कलम ४, २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१), ३७(३), १३५ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
या प्रकरणाचे फिर्यादी पोलीस अंमलदार खुशाल रामदास कावळे, ब.नं. ५०७, पोलीस स्टेशन भद्रावती आहेत. तपासाची जबाबदारी पोलीस उपनिरीक्षक संतोष केदार यांच्याकडे आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रभारी अधिकारी सचिन खेत्रे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक संतोष केदार, सफौ. महेंद्र बेसरकर, पोलीस हवालदार अनुप आस्टूनकर, देवानंद डुकरे, गोपाल आतकुलवार, प्रशांत शेंदरे, पोलीस अंमलदार खुशाल कावळे, योगेश घाटोळे, संतोष राठोड आणि एमपीओ मोनाली धारागटे यांनी सहभाग घेतला.
आरोपीवरील आरोप न्यायालयीन प्रक्रियेत सिद्ध होणे बाकी आहे.


