भद्रावती (जि. चंद्रपूर) ,दि. २४ जानेवारी २०२६
भद्रावती तालुक्यातील पिरली येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर भद्रावती पोलिसांनी अचानक छापा टाकत चार जणांना रंगेहात अटक केली असून सुमारे ४ लाख २९ हजार ५१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या दरम्यान पिरली (ता. भद्रावती) येथे काही इसम सलग ५२ तास पत्त्यावर पैशांची बाजी लावत जुगार खेळत असल्याची खात्रीशीर गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे भद्रावती पोलिसांनी तात्काळ कारवाई करत घटनास्थळी छापा टाकला. यावेळी जुगार खेळत असलेले आरोपी रंगेहात सापडले.
या कारवाईत अटक करण्यात आलेल्या पोलीस सूत्रांकडून मीळालेल्या माहितीनुसार आरोपींची नावे घनश्याम शेषराव उताने (वय ५०, रा. मांगली), दिपक नथ्युजी बोथले (वय ३३, रा. वाघोडा), मारोती उर्फ नंदकिशोर महादेव झाडे (वय ४२, रा. पिरली) व हनुमान ज्ञानेश्वर देठे (वय ३५, रा. पिरली), ता. भद्रावती अशी आहेत.
या प्रसंगी पोलिसांनी आरोपींकडून रोख रक्कम ३ हजार १६० रुपये, डावावर ठेवलेली १ हजार २५० रुपये, जुगाराचे साहित्य, तसेच ०६ मोटारसायकली (अंदाजे किंमत ४ लाख २५ हजार रुपये) असा एकूण ४ लाख २९ हजार ५१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची पण माहीती पोलीस सूत्रांकडून कळविण्यात आली.
या प्रकरणी भद्रावती पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहीती पण पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, मा. अपर पोलीस अधीक्षक ईश्वर काटकडे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बावकल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोउनि. गजानन तुपकर, सफौ. महेंद्र बेसरकर, अनुप आतकुलवार, जगदीश झाडे, विश्वनाथ चुदरी, गोपाल आतकुलवार, खुशाल कावळे, योगेश घाटोळे, संतोष राठोड यांनी केली.
- रस्त्यावरील झाडे अपघातांचे कारण;प्रशासनाचे दुर्लक्ष..!
- नामुचा “डल्ला” ठेकेदार-दारू विक्रेत्यांकडून “उत्साह” चा “फंड”..!
- भद्रावती आंबेडकरी राजकारणात संभ्रम; बी.एस.पी. व वंचित बहुजन आघाडीची भूमिका अस्पष्ट
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- विस वर्षांनंतर लोकमान्य विद्यालयाच्या वर्गमित्रांचा भावनिक पुनर्मिलन समारंभ
- जुन्या कार्यकर्त्यांना डावलून स्वयंघोषित नाम्यांच्या “डल्ला” प्रकरणावर नारीशक्तीने ठोस निषेध..
- भद्रावतीतील नाम्याचा राजकीय विस्फोट…! ज्येष्ठांचा विश्वासघात, अवैध व्यवसायांचा आधार, आणि पक्षांतर्गत वाढते वाद..! नाम्याचा “डल्ला” ..! स्वयंघोषित नेतृत्वाने भद्रावतीत वादांचा वाढता पाऊस…
- भद्रावती नगरपरिषद निवडणूक; प्रभाग ७ मध्ये इम्रान खान हे संभाव्य नगरसेवक म्हणून चर्चेत…!
- “त्या” पक्षातील पारदर्शकतेवर जुन्या निष्ठावंतांचा भडकता ऐल्गार..! नाम्या यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह..!


