Monday, October 26, 2026
Homeभद्रावतीलाच मागणाऱ्यांनो सावधान! चंद्रपूर ACB चे नागरिकांना थेट आवाहन

लाच मागणाऱ्यांनो सावधान! चंद्रपूर ACB चे नागरिकांना थेट आवाहन

चंद्रपूर ACB चा भ्रष्टाचाराविरोधात दणका!

२६ ऑक्टोबरपासून दक्षता जनजागृती सप्ताह; लाच मागणाऱ्यांविरोधात तक्रार करण्याचे आवाहन

चंद्रपूर, न्यूज डेस्क

शंकर बोरघरे, 95 52 61 25 55 

शासकीय कामासाठी लाच मागणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना आळा घालण्यासाठी आणि प्रशासनात पारदर्शकता निर्माण करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूरने दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन केले आहे. २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत हा सप्ताह राबविण्यात येणार आहे.

केंद्रीय दक्षता आयोग आणि महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार आयोजित या सप्ताहाची यंदाची संकल्पना ‘समृद्धीसाठी सत्यनिष्ठा’ अशी आहे. भ्रष्टाचारमुक्त समाज निर्माण करण्यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता वाढविण्यावर या अभियानात भर दिला जाणार आहे.

या सप्ताहादरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालये, बसस्थानके, रेल्वे स्थानके, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. तसेच फेसबुक, व्हॉट्सॲप, एसएमएस आणि इतर समाजमाध्यमांच्या माध्यमातूनही नागरिकांपर्यंत भ्रष्टाचारविरोधी संदेश पोहोचविण्यात येणार आहे.

लाच मागितल्यास थेट १०६४ वर संपर्क साधा!

शासकीय काम करून देण्यासाठी कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी लाचेची मागणी करत असेल, तर नागरिकांनी दबावाला बळी न पडता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागाने केले आहे.

भ्रष्टाचाराविरोधात केवळ चर्चा करून चालणार नाही, तर नागरिकांनी पुढे येऊन अशा प्रकारांना विरोध करणे गरजेचे आहे. शासकीय कामासाठी लाच देण्याची वेळ नागरिकांवर येऊ नये आणि सरकारी यंत्रणेतील गैरप्रकारांना आळा बसावा, यासाठी जनजागृतीसोबतच तक्रारींची योग्य दखल घेणेही महत्त्वाचे आहे.

नागरिकांनी लाच मागितल्यास टोल फ्री क्रमांक १०६४ किंवा ०७१७२-२५०२५१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक अनिल जिट्टावार, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर यांनी केले आहे.

भ्रष्टाचारमुक्त प्रशासनासाठी नागरिकांनी जागरूक राहून या जनजागृती अभियानात सहभागी व्हावे, हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!