Saturday, April 18, 2026
Homeभद्रावतीभद्रावतीत स्वयंघोषित ‘नेत्यांचा’ सुळसुळाट; नागरिक व व्यापाऱ्यांनी सतर्क राहावे

भद्रावतीत स्वयंघोषित ‘नेत्यांचा’ सुळसुळाट; नागरिक व व्यापाऱ्यांनी सतर्क राहावे

चंद्रपूर भद्रावती न्यूज डेस्क

परिसरात अलीकडच्या काळात स्वतःला मोठे राजकीय नेतृत्व असल्याचे भासवून, खोटे-नाटे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करत नागरिक व व्यापाऱ्यांना ब्लॅकमेल करण्याचे प्रकार वाढले आहेत. असे स्वयंघोषित व्यक्ती गावभर फिरत दबाव टाकत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत.
या पार्श्वभूमीवर भाजयुमो प्रदेश सचिव यांनी नागरिक, व्यापारी व उद्योजकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. कुठल्याही अज्ञात व्यक्तीच्या धमकी, दबाव किंवा सोशल मीडियावरील बनावट दावे, खोटे व्हिडीओ व राजकीय ओळखींचे प्रदर्शन यांना बळी न पडता, तात्काळ स्थानिक प्रशासन किंवा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
“खोटे व्हिडीओ, बनावट ओळखी आणि धमक्यांच्या आधारे दबाव टाकणाऱ्यांचा उद्देश केवळ ब्लॅकमेल करणे हाच असतो. अशा नोटंकिबाजांना थारा देऊ नका. कायद्याचा मार्ग अवलंबा,” असे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांनी एकमेकांना माहिती देऊन सजग राहावे, संशयास्पद हालचाली, धमक्या किंवा आर्थिक मागणीचे प्रकार दिसल्यास तत्काळ संबंधित यंत्रणांना कळवावे, असेही या आवाहनात नमूद करण्यात आले आहे.

✍️ रोखठोक संदेश स्पष्ट आहे , खोट्या नेतागिरीचा बुरखा पांघरलेले नोटंकिबाज ओळखा आणि दूर ठेवा.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!