Saturday, June 6, 2026
Homeभद्रावतीबसस्टॉपवरील सुरक्षेचा प्रश्न गंभीर; भाजपा महिला आघाडीची मागणी..

बसस्टॉपवरील सुरक्षेचा प्रश्न गंभीर; भाजपा महिला आघाडीची मागणी..

भद्रावती न्यूज डेस्क ✍️

चंद्रपूर, नागपूर महामार्गावरील भद्रावती बसस्थानक परिसरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत चालला असून, येथे तात्काळ पोलिस मदत केंद्र उभारावे, अशी ठोस मागणी भाजपा महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबतचे निवेदन भद्रावती पोलीस स्टेशन येथे सादर करण्यात आले. शिक्षण, नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने तसेच ग्रामीण भागातून दररोज मोठ्या संख्येने महिला व तरुणी बसस्थानकावर ये-जा करतात. मात्र काही असामाजिक प्रवृत्तींच्या वावरामुळे महिलांना अस्वस्थ वातावरणाचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
प्रसंगी संध्याकाळच्या वेळेस विशेषतः महिलांना त्रास होण्याच्या तक्रारी वाढत असून, संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी बसस्थानक परिसरात कायमस्वरूपी पोलिस मदत केंद्र स्थापन करून नियमित गस्त वाढवावी, अशी मागणी करण्यात आली. महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत प्रशासनाने विलंब न करता तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी भाजपा महिला आघाडी अध्यक्षा, नगरसेवक तथा सभापती नगरपरिषद भद्रावती सौ. वृषाली पांढरे, नगरसेविका सौ. कविता सावणकर, सुलभा मद्दीवार, सौ. मंजुषा रॉय, डिंपल गुरूनुले, सौ. तेजश्री निवेलकर, सौ. शीला आगलावे, सौ. माधुरी ढगे व सौ. वर्षा आत्राम उपस्थित होत्या.
याशिवाय महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता ऐरणीवर आला असून, प्रशासनाच्या भूमिकेकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!