Saturday, June 6, 2026
Homeभद्रावतीमहाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई शाखा चंद्रपूर तालुका भद्रावती यांच्या वतीने भद्रनाग...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई शाखा चंद्रपूर तालुका भद्रावती यांच्या वतीने भद्रनाग देवस्थान परिसरात शाबुदाणा खिचडी वाटप..!

भक्ती आन्‌ सेवेचा संगम; महाशिवरात्रीला भद्रावतीत समाजएकतेचा संदेश!

उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांची सदिच्छा भेट..!

भद्रावती न्यूज डेस्क✍️

महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त भद्रावती नगरीत भक्तीचा सुंदर दरवळ अनुभवायला मिळाला. “हर हर महादेव”च्या जयघोषात आणि श्रद्धेच्या वातावरणात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई शाखा चंद्रपूर तालुका भद्रावती यांच्या वतीने येथील भद्रनाग देवस्थान येथे उपवास करणाऱ्या भाविकांसाठी शाबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले.
प्रसंगी सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी वर्दळ होती. शिवभक्तांनी अभिषेक, पूजन आणि मंत्रजप करत महादेवाची आराधना केली. अशा भक्तीमय वातावरणात खिचडीची सेवा भाविकांसाठी आधारवटिका ठरली. अनेकांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.
या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी, चंद्रपूर येथील प्रमोद चौगुले यांनी सदिच्छा भेट देऊन उपस्थिती दर्शविली. त्यांनी महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देत शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले. त्यांच्या उपस्थितीमुळे मंदिर परिसरात विश्वासाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी जिल्हाध्यक्ष शंकर बोरघरे यांच्या मार्गदर्शनाखाली खिचडी वाटप सुरळीत पार पडले. तालुका अध्यक्ष संतोष शिवणकर, उपाध्यक्ष महेश निमसठकर, सुनील दैदावार, शाम चटपल्लीवार यांनी सेवेत सहभाग घेतला.
तसेच माजी नगरसेवक अफझल भाई, इम्रान खान, समाजसेवक सूरज शहा, जयंता जवादे, अल्ताफ शेख, शुभम डोंगे आदी मान्यवर उपस्थित होते. विविध समाजघटकांनी एकत्र येऊन केलेल्या या उपक्रमातून समाजएकतेचा स्पष्ट संदेश मिळाला.
महाशिवरात्रीचा हा दिवस भद्रावतीत भक्ती, सेवा आणि विश्वास यांचा अविस्मरणीय संगम ठरला.

हर हर महादेव! 🙏

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!