Saturday, June 6, 2026
Homeभद्रावती“दारूपेक्षा खर्रा जास्त फेमस!” टप्ता चौक मुख्य प्रवेशद्वारावर ‘खर्रा ब्रँड’ची गर्दी?

“दारूपेक्षा खर्रा जास्त फेमस!” टप्ता चौक मुख्य प्रवेशद्वारावर ‘खर्रा ब्रँड’ची गर्दी?

“दारूपेक्षा खर्रा जास्त फेमस!” टप्ता चौक मुख्य प्रवेशद्वारावर ‘खर्रा ब्रँड’ची गर्दी?

भद्रावती न्यूज डेस्क ✍️

परिसरातील वाढत्या गर्दीबाबत एका स्थानिक महिलेने तीव्र आणि उपरोधिक प्रतिक्रिया नोंदवली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, “येथील खर्रा तर मध्येच नव्हे तर पर्यंत फेमस झाला आहे; दारूपेक्षा जास्त चर्चा आता या खर्र्याचीच होते!”

प्रवेशद्वाराजवळील पानठेल्यांवर सुगंधित तंबाखूजन्य खर्रा विक्रीमुळे दिवसभर युवकांची गर्दी उसळलेली दिसते. काही वाहनचालक रस्त्यावरच गाड्या उभ्या करून खरेदी करतात, तर काहीजण चौकातच थांबून गप्पा मारतात. त्यामुळे मुख्य चौकात वाहतुकीचा वेग मंदावतो आणि गोंधळाचे चित्र निर्माण होते.

महिलेच्या मते, हा चौक आता प्रवेशद्वारापेक्षा “खर्रा पॉइंट” म्हणून अधिक ओळखला जाऊ लागला आहे. दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना मार्ग काढताना अडचणींचा सामना करावा लागत असून, अपघातांच्या घटना वाढत असल्याचीही चर्चा आहे.

तालुक्यातील खेळ्या-पाळ्यातून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचीही या मार्गावरून दररोज ये-जा असते. सकाळ-सायंकाळी विद्यार्थ्यांची वर्दळ आणि त्याच वेळी रस्त्यालगतची गर्दी यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनत असल्याचे त्यांनी नमूद केले.


पुढे त्यांनी असेही नमूद केले की…

जर हीच स्थिती कायम राहिली, तर भविष्यात हा चौक “अपघातांचा हॉटस्पॉट” म्हणून ओळखला जाईल. शहराच्या सन्मानाचे प्रतीक असलेले प्रवेशद्वारच जर तंबाखू विक्री आणि गर्दीसाठी प्रसिद्ध होत असेल, तर ही चिंतेची बाब असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“प्रवेशद्वारावर वाहतूक शिस्त, सिग्नल व्यवस्था आणि कडक नियंत्रण नसल्यास, उद्या या ठिकाणाची ओळख शहराच्या विकासामुळे नव्हे तर ‘खर्रा प्रसिद्धी’मुळे होईल,” अशी उपरोधिक टिप्पणीही त्यांनी केली.

प्रशासनाने तातडीने पानठेल्यांचे नियमन, वाहतूक नियंत्रण आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा, नागरिकांना पुढील काळात अधिक तीव्र भूमिका घ्यावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!