Friday, April 17, 2026
Homeभद्रावती“खर्रा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर कोण? खर्र्यानेच भद्रावती गाजवली का?”

“खर्रा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर कोण? खर्र्यानेच भद्रावती गाजवली का?”

यभद्रावतीचा खर्रा… चंद्रपूरात फेमस, पुण्याला करतो प्रवास!

भद्रावती विशेष वार्ता ✍️

भद्रावतीत सध्या एकच चर्चा, एकच विषय, एकच शब्द खर्रा!
सकाळ झाली की खर्रा… दुपार झाली की खर्रा… सायंकाळी तर हवेत दरवळतो तोही खर्रा! शहरात जणू “खर्रा युग” सुरू झालं आहे अशी गंमत रंगली आहे.

चौकागणिक खर्रा, गल्लोगल्ली खर्रा, बाजारपेठेत खर्रा, टपऱ्यांवर “स्पेशल खर्रा”, “सुपर खर्रा”, “भद्रावती खर्रा” अशा घोषणा! काही जण गंमतीने म्हणतात, “भद्रावतीचा शब्दकोश उघडला तर पहिलाच शब्द खर्रा!”

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, भद्रावतीचा खर्रा इतका प्रसिद्ध झाला आहे की त्याची चर्चा थेट चंद्रपूरमध्ये रंगते, तर काहींच्या मते पुणेमध्येही “भद्रावती खर्रा आहे का?” अशी विचारणा होते. जणू खर्र्यानेच शहराची ब्रँडिंग, मार्केटिंग आणि पब्लिसिटी हातात घेतली आहे!

रस्त्यावर दृश्यही भन्नाट एका हातात मोबाईल, दुसऱ्या हातात खर्रा. गप्पांचा विषय? पुन्हा खर्रा. कोणाचा खर्रा भारी? कुठला मिक्स झकास? कोणत्या गल्लीतला खर्रा नंबर वन? जणू संपूर्ण शहर “खर्रा परिषद” भरवत आहे.

वाहतूक कोंडीत अडकलेला चालकही मनात म्हणत असेल, “ही कोंडी खर्र्यामुळे की खर्रा कोंडीमुळे?” काही ठिकाणी वाहन थांबतं, चर्चा सुरू होते… आणि चर्चेचा शेवटही पुन्हा खर्र्यावरच!

काही नागरिक बोचऱ्या सुरात म्हणतात, “भद्रावतीत हवा बदलली नाही, पण खर्र्याची हवा मात्र जोरात आहे!” तर काहींचा सवाल “खर्रा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर कोण? एखादा सेलिब्रिटी की संपूर्ण शहरच?”

पुढील भाग असा…

जर हीच खर्र्याची लाट अशीच उसळत राहिली,
तर उद्या कुठेतरी नाव लिहिलं जाईल
“भद्रावती जिथे विकासाच्या बातम्या कमी, पण खर्र्याच्या बातम्या जास्त!”

हास्य वेगळं… पण प्रश्न खरा.
भद्रावतीची ओळख खर्र्यानेच होत आहे का?

खर्रा चर्चेत राहो, पण शहर विकासात पुढे जावो
हीच अपेक्षा. नाहीतर उद्या नकाशावर लिहिलं जाईल

“आपले स्वागत आहे… खर्रा नग…!”

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!