Friday, September 4, 2026
Homeचंद्रपूरनिर्भीड लेखणी थांबली; अनुपकुमार भार्गव यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रात शोककळा

निर्भीड लेखणी थांबली; अनुपकुमार भार्गव यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रात शोककळा

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई

विदर्भ अध्यक्ष अनुप कुमार भार्गव सर,  पत्रकारितेची बुलंद तोफ हरपली!

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईचे विदर्भ अध्यक्ष तथा पुलगाव टाइम्सचे मुख्य संपादक आदरणीय अनुप कुमार भार्गव सर यांच्या आकस्मिक निधनाची दुःखद वार्ता अत्यंत मन हेलावून टाकणारी आहे.

पत्रकारिता क्षेत्रात निर्भीड लेखणी, परखड विचार आणि कणखर नेतृत्वाची ओळख निर्माण करणारे, पत्रकारांच्या हक्कांसाठी सदैव आवाज उठविणारे आणि संघटनेला बळ देणारे विदर्भ पत्रकार संघटनेचे बुलंद नेतृत्व आज काळाच्या पडद्याआड गेले.

अनुप कुमार भार्गव सर म्हणजे केवळ एक पत्रकार नव्हते, तर अनेक पत्रकारांसाठी मार्गदर्शक, आधारवड आणि प्रेरणास्थान होते. त्यांच्या कार्यातून पत्रकारिता क्षेत्राला नवी दिशा मिळाली. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईसह संपूर्ण विदर्भातील पत्रकारिता क्षेत्राची न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.

त्यांची निर्भीड लेखणी, संघर्षशील वृत्ती, पत्रकारांच्या प्रश्नांसाठीची तळमळ आणि आपुलकीचे व्यक्तिमत्त्व सदैव स्मरणात राहील. त्यांचे विचार आणि कार्य हीच त्यांच्या स्मृतींना खरी आदरांजली ठरेल.

भावपूर्ण श्रद्धांजली!

ॐ शांती! ॐ शांती! ॐ शांती!

शोकाकुल
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई
जिल्हा शाखा ,… चंद्रपूर

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!