Friday, September 4, 2026
Homeभद्रावतीभद्रावतीचा खर्रा झाला ‘अंडरग्राउंड’; प्रशासनाची चाहूल लागताच सगळे शांत!

भद्रावतीचा खर्रा झाला ‘अंडरग्राउंड’; प्रशासनाची चाहूल लागताच सगळे शांत!

भद्रावतीचा ‘फेमस खर्रा’ आता लपूनछपून!

खिशातून हळूच विचारतात, “खर्रा पाहिजे का?”; प्रशासनाची चाहूल लागताच विक्रेत्यांची धावपळ

भद्रावती,  न्यूज डेस्क….भद्रावतीचा ‘फेमस खर्रा’ म्हटला की अनेकांच्या जुन्या आठवणी जाग्या होतात. काही दिवसांपूर्वी ‘खर्रा टपरीवर दिसत नाही, मात्र त्याच्या आठवणी ताज्या आहेत’ अशा आशयाचे विनोदी कथानक चर्चेत आले होते. आता याच कथानकाला आणखी एक मजेशीर वळण मिळाले आहे.

पूर्वी टपरीवर जाऊन सरळ “भाऊ, एक खर्रा द्या,” अशी मागणी केली जायची. मात्र आता कथानकातील परिस्थिती अशी आहे की खर्रा टपरीवर उघडपणे दिसण्याऐवजी तो लपूनछपून खिशातून देण्याची वेळ आली आहे.

आजूबाजूला नजर फिरवायची… कुणाचे लक्ष नाही ना, हे पाहायचे आणि मग हळूच प्रश्न

“खर्रा पाहिजे का?”

होकार मिळाला की खिशातून पुडी बाहेर!

प्रशासनाची चाहूल अन् ‘गायब मिशन’!

मात्र या सगळ्यात तात्यांना सर्वाधिक आश्चर्य वाटते ते प्रशासनाची चाहूल लागताच सुरू होणाऱ्या धावपळीचे.

प्रशासन आले की क्षणात वातावरण बदलते. काही क्षणांपूर्वी दिसणारी मंडळी अचानक गायब! तात्या इकडे-तिकडे पाहत म्हणतात

“अरे देवा! खर्रा शोधायला आलो होतो; इथे तर खर्रा विकणारेच शोधावे लागत आहेत!”

यावर टपरीवाला मिश्कीलपणे म्हणतो

“तात्या, आता खर्रा विक्री नाही… हा तर ‘गुप्त ऑपरेशन’ आहे!”

तात्या कपाळावर हात मारत म्हणतात..

“मग पुढच्या वेळी खर्रा खरेदी करायला ओळखपत्र, पासवर्ड आणि गुप्त संकेतही लागणार की काय?”

या काल्पनिक प्रसंगावरून भद्रावतीतील जुन्या ‘फेमस खर्र्या’च्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळत आहे. मात्र प्रत्यक्षात नियमबाह्य विक्री होत असल्यास संबंधित प्रशासनाने त्याची दखल घेऊन नियमानुसार कारवाई करणे अपेक्षित आहे.

क्रमशः…

तात्यांचा खर्रा शोधाचा प्रवास अजून संपलेला नाही!

टीप-: प्रस्तुत लेखन हे पूर्णतः काल्पनिक, विनोदी व व्यंगात्मक स्वरूपातील कथानक आहे. यातील पात्रे, प्रसंग व संवाद हे केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने रचलेले आहेत. कोणत्याही व्यक्ती, संस्था, व्यवसाय किंवा घटनेशी याचा थेट संबंध जोडण्याचा हेतू नाही. कोणाचीही भावना दुखावणे, बदनामी करणे किंवा गैरसमज निर्माण करणे हा या लेखाचा उद्देश नाही. जुन्या खर्र्याच्या आठवणी जपणाऱ्या सर्वांनी हा मजकूर केवळ विनोदी कथानक म्हणून घ्यावा.

 

Shankar Borghare 95 52 61 25 55

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!