Friday, September 11, 2026
Homeभद्रावतीराजकारणाचा आखाडा की जनतेच्या विश्वासाचे व्यासपीठ?

राजकारणाचा आखाडा की जनतेच्या विश्वासाचे व्यासपीठ?

‘बातमी कळावी’ म्हणून बनला ग्रुप… आणि बातमी आली की चर्चेचा भूकंप!

व्हॉट्सअॅप समूह नेमका बातम्यांसाठी, जनप्रतिनिधींसाठी की राजकीय चर्चेसाठी? सदस्यांमध्ये रंगली भन्नाट चर्चा

भद्रावती, न्यूज डेस्क, शंकर बोरघरे

बातम्या, जनतेच्या समस्या आणि परिसरातील विविध घडामोडी संबंधितांपर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने सुरू असलेल्या एका व्हॉट्सअॅप समूहावरून सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे, “हा ग्रुप नेमका कोणासाठी आहे?” या प्रश्नानेच ग्रुपमधील चर्चेला वेगळे वळण मिळाले आहे.

संबंधित व्यक्तीने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, हा समूह कोणत्याही संस्थेने अधिकृतपणे तयार केलेला नसून, ते संबंधित क्षेत्रात कार्यरत असताना मीडिया प्रतिनिधींना आणि परिसरातील बातम्यांची माहिती कळावी या उद्देशाने तयार करण्यात आला होता. सेवानिवृत्तीनंतरही पत्रकार म्हणून कार्यरत असल्याने हा समूह कायम ठेवण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.

मात्र, काही सदस्यांनी या समूहात राजकीय स्वरूपाच्या चर्चा किंवा संदेश येत असल्याबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यावरून हा समूह नेमका बातम्यांसाठी, पत्रकारांसाठी, जनप्रतिनिधींसाठी की राजकीय चर्चेसाठी? असा सवाल उपस्थित झाला.

या चर्चेत एक मुद्दा मात्र स्पष्टपणे पुढे आला की, समूहाचा मुख्य उद्देश परिसरातील घडामोडी आणि जनतेच्या प्रश्नांची माहिती संबंधित जनप्रतिनिधी व पत्रकारांपर्यंत पोहोचविणे हाच असावा.

फक्त वाहवा नाही, प्रश्नही कळले पाहिजेत!

समूहात चांगल्या कामांची माहिती येणे आवश्यक आहेच; मात्र जनतेच्या समस्या, त्रुटी, अपूर्ण कामे आणि नागरिकांचे प्रश्न यांची माहितीही संबंधितांपर्यंत पोहोचणे तितकेच महत्त्वाचे आहे.

कारण…

फक्त सत्काराचे फोटो आणि अभिनंदनाचे संदेश म्हणजे बातमी नव्हे; खड्डे, पाणी, कचरा आणि नागरिकांचे प्रश्नही बातमीच असतात!

रोखठोक निष्कर्ष…

ग्रुप कोणाचा, यापेक्षा ग्रुपमधून जनतेचे प्रश्न संबंधितांपर्यंत पोहोचतात का, हा खरा मुद्दा आहे.

बाकी, व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये एकदा “हा ग्रुप नेमका कोणासाठी आहे?” हा प्रश्न निघाला की, बातमीपेक्षा चर्चेचीच मोठी ब्रेकिंग न्यूज होते… हे मात्र नक्की!

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!