भाजयुमोचा नवनियुक्त भाजप शहराध्यक्ष किशोर गोवारदीपे यांना दमदार पाठिंबा!
सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा; इम्रान खानांसह भाजयुमो पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
भद्रावती न्यूज डेस्क , 95 52 61 25 55
भारतीय जनता पक्षाच्या भद्रावती शहराध्यक्षपदी नवनियुक्त झालेले किशोरभाऊ गोवारदीपे यांचा भारतीय जनता युवा मोर्चा, भद्रावती शहरच्या वतीने सत्कार करण्यात आला. भाजपची शहरातील संघटनात्मक ताकद अधिक भक्कम करण्याच्या नव्या जबाबदारीसाठी भाजयुमोच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा देत पुढील वाटचालीसाठी पाठिंबा व्यक्त केला.
यावेळी भाजयुमोचे प्रदेश सचिव इम्रान खान यांच्या उपस्थितीत नवनियुक्त शहराध्यक्ष किशोरभाऊ गोवारदीपे यांचा सत्कार करण्यात आला. भाजप आणि भाजयुमोची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करून युवकांना पक्षाच्या कार्यात सक्रिय करण्यासाठी नव्या नेतृत्वाकडून प्रभावी कामगिरीची अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
या सत्कार कार्यक्रमाला भाजयुमोचे प्रदेश सचिव इम्रान खान, जिल्हा उपाध्यक्ष श्रीपाद भाकरे, शहर महामंत्री मोनु पारधे, प्रदीप लोणकर, तौसिफ शेख, संघटन मंत्री राकेश खुसपुरे, शहर उपाध्यक्ष सुनिल बोरकुटे, शहर सचिव स्वप्नील बारसागडे, विद्यार्थी आघाडीचे जिल्हा महामंत्री शिवा पांढरे यांच्यासह भाजयुमोचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
नवनियुक्त शहराध्यक्ष किशोरभाऊ गोवारदीपे यांच्या नेतृत्वाखाली भद्रावती शहरातील भाजपची संघटनात्मक घडी अधिक मजबूत होईल, असा विश्वास उपस्थित भाजयुमो पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.


