Wednesday, November 4, 2026
Homeचंद्रपूरदुर्गापूरात उत्पादन शुल्क विभाग ॲक्शन मोडवर; २६४ लिटर ताडी जप्त

दुर्गापूरात उत्पादन शुल्क विभाग ॲक्शन मोडवर; २६४ लिटर ताडी जप्त

दुर्गापूरात अवैध ताडीविक्रीवर उत्पादन शुल्क विभागाचा धडाका!

२६४ लिटर ताडी जप्त; १७ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत, दोघांविरुद्ध कारवाई

चंद्रपूर, न्यूज डेस्क

शंकर बोरघरे, 95 52 61 25 55 

दुर्गापूर परिसरात अवैध ताडीविक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळताच राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरुवारी सकाळी धडक कारवाई केली. या कारवाईत २६४ लिटर ताडी आणि विक्रीसाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण १७ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी दोघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या चंद्रपूर कार्यालयाला दुर्गापूर परिसरात अवैध ताडीविक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापा टाकला. या कारवाईत परशुराम राजन्ना गोटपेंटीवार (रा. आदित्य अपार्टमेंट, वॉर्ड क्रमांक २, दुर्गापूर) आणि रोशन मुकेश जुनघरे (रा. वॉर्ड क्रमांक २, दुर्गापूर) यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली.

छाप्यादरम्यान ताडीने भरलेल्या बाटल्या, ताडीची साठवणूक व विक्रीसाठी वापरण्यात येणारे साहित्य तसेच सीसीटीव्ही यंत्रणेतील डीव्हीआर जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत १७ हजार ७४० रुपये असल्याचे विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहेत.

अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन कु. धार्मिक यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. भरारी पथकाचे निरीक्षक दत्तात्रय वरटी, जवान चेतन अवचट, सुजित चिखाटे आणि वाहनचालक प्रवीण निमगाडे यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.

जिल्ह्यात अवैध मद्यनिर्मिती, साठवणूक आणि विक्रीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून धडक कारवाया करण्यात येत आहेत. दुर्गापूरमधील या कारवाईमुळे अवैध ताडीविक्रीविरोधात विभागाने सक्रिय भूमिका घेतल्याचे दिसून आले. अशा अवैध व्यवसायांत सहभागी असणाऱ्यांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही विभागाने दिला आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!