Saturday, June 6, 2026
Homeभद्रावती“नाम्या आणि ती अचानक आलेली, खुर्ची” !एक सुचक "कथा"...!

“नाम्या आणि ती अचानक आलेली, खुर्ची” !एक सुचक “कथा”…!

चंद्रपूर, न्यूज डेस्क ✍️

गावात एक नाम्या होता.
तो फार बोलका नव्हता, पण योग्य वेळी योग्य ठिकाणी उभा राहण्याची त्याला कमाल कला अवगत होती.

गावात जेव्हा सभा असायच्या, तेव्हा नाम्या पहिल्या रांगेत नसायचा… पण फोटोमध्ये मात्र नेहमी दिसायचा. कामं इतर करत, धावपळ इतरांची असायची; पण शेवटी टाळ्यांचा आवाज कुणाच्या दिशेने वळेल, हे नाम्याला चांगलंच ठाऊक होतं.

एके दिवशी गावात एक खुर्ची रिकामी झाली.
ती खुर्ची साधी नव्हती ती जादुची  होती.
लोकांच्या नजरा तिच्याकडे होत्या. चर्चा सुरू झाली. अंदाज बांधले गेले. काहींना वाटलं, वर्षानुवर्षे धावणाऱ्यांना ती मिळेल. काहींना खात्री होती, अनुभवी हातातच जाईल.

पण एक सकाळ आली… आणि लोकांनी पाहिलं त्या खुर्चीवर नाम्या बसलेला होता.

कोणी विचारलं, “कधी झालं हे?”
कोणी म्हणालं, “अहो, प्रक्रिया झाली म्हणे…”
कोणी हसत म्हणालं, “नाम्या शांत होता, पण गणित मात्र मोठं मांडत होता.”

नाम्या मात्र शांतच.
तो म्हणाला, “मी काही मागितलं नाही. खुर्चीच मला शोधत आली.”

गावात अजूनही चर्चा सुरू आहेत.
काही म्हणतात, हा योगायोग.
काही म्हणतात, ही नियोजनाची कमाल.
आणि काही फक्त एवढंच म्हणतात..
“नाम्या आहेच तसा… दिसतो साधा, पण चालतो पुढेच.”

आता खरी कहाणी काय, हे फक्त नाम्या आणि ती खुर्चीच जाणतात.

सदर ही काल्पनिक कथा स्वरूपात आहेत कोणाही बद्दल सदर प्रकार जुळतात तर तो योगायोग असेल

 

पुढील भागात सुचक कथेचा 

जीवन प्रवास ..

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!