Saturday, June 6, 2026
Homeभद्रावतीमिलिंद ताजने यांचे अवैध रेतीसह वाहन जप्त; महसूल प्रशासनाची कारवाई!

मिलिंद ताजने यांचे अवैध रेतीसह वाहन जप्त; महसूल प्रशासनाची कारवाई!

भद्रावती न्यूज डेस्क ✍️

भद्रावती तालुक्यात अवैध रेती उत्खनन व वाहतुकीवर तहसील प्रशासनाने मोठी धडक कारवाई करत ट्रॅक्टर जप्त केले. तहसीलदार राजेश भांडारकर यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाच्या पथकाने ही कारवाई राबविली.

विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कुचना येथील नागलोण फाटा परिसरात पहाटे गस्तीदरम्यान संशयित ट्रॅक्टर अडविण्यात आला. तपासणीदरम्यान ट्रॅक्टर क्रमांक MH29 BD 8482 मध्ये सुमारे १ ब्रास रेती विनापरवाना वाहतूक होत असल्याचे आढळून आले. संबंधित वाहन तात्काळ जप्त करण्यात आले.

कारवाईदरम्यान ग्राम महसूल अधिकारी खोब्रागडे यांनी तत्परतेने पथकाला माहिती दिली. त्यानंतर तहसील कार्यालयात वाहन जमा करण्यासाठी तहसीलच्या वाहनाद्वारे ग्राम महसूल अधिकारी शुभम धात्रक व खुशाल मस्के यांना पाचारण करण्यात आले. त्यांच्या उपस्थितीत ट्रॅक्टर तहसील कार्यालयात उभा करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.

जप्त ट्रॅक्टरचे मालक मिलिंद नथ्थुजी ताजने असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

अवैध रेती उत्खननाविरोधात महसूल विभागाने कठोर भूमिका घेतली असून, अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांवर सातत्याने कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा तहसील प्रशासनाने दिला आहे. या कारवाईमुळे तालुक्यात अवैध रेती वाहतुकीवर आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!