Saturday, June 6, 2026
Homeभद्रावतीभद्रावतीची सुगंधी गाथा..! एक काव्यमय वार्ता

भद्रावतीची सुगंधी गाथा..! एक काव्यमय वार्ता

“दारूपेक्षा खर्रा जास्त फेमस!”

भद्रावती न्यूज डेस्क ✍️

भद्रावती नगरी, उद्योगांची कहाणी,
संस्कृती, परंपरा, वारशाची निशाणी…
पण आजकाल चर्चा काही वेगळीच झाली,
रस्त्यावरच्या सुगंधानेच कीर्ती कमावली!

चंद्रपूरपासून गल्लोगल्ली कुजबुज सुरू,
“खर्रा इथला भारी!” अशीच चर्चा भरू.
कुणी म्हणे, ही कीर्ती आता थेट पुणेला पोचली,
दारूला मागे टाकून ‘सुगंधी लाट’ पुढे सरसावली!

चौकागणिक दिसे पानठेल्यांची माळ,
गप्पांचा फड, हशांचा जाळ.
दुचाकी थांबे, चारचाकी वळे,
वाहतुकीचे नियम मात्र बाजूला पडले.

सकाळी कॉलेजकुमार, दुपारी बाजार,
सायंकाळी मित्रमंडळींचा दरबार.
कोणी म्हणे“हीच भद्रावतीची नवी ओळख!”
तर कोणी म्हणे “सुगंधी प्रसिद्धीचाच लोभ!”

रस्त्यांवर गर्दीचा रंगलेला खेळ,
हॉर्नचा नाद आणि हशांचा मेळ.
वाहनचालक म्हणती “मार्ग कुठे आहे?”
समोरच उभा ‘सुगंधी’ प्रवाह आहे!

विद्यार्थ्यांची धावपळ, प्रवाशांचा रेला,
शहरभर जणू ‘खर्रा उत्सव’चा सोहळा.
कुणी गंमतीने म्हणे“GPS सांगतो आता,
डावीकडे वळा, पुढे आहे सुगंधी वाटा!”

भद्रावतीची ओळख होती उद्योगनगरी,
आता चर्चा मात्र सुगंधाभोवती फिरी.
दारूपेक्षा जास्त फेमस म्हणे हा खर्रा,
शहरभर उठला ‘हास्याचा झर्रा’!

पण या कवितेत दडलेला अर्थ गहिरा,
हास्यातून उमटतो संदेश थोडा गंभीर.
शहराची शिस्त, वाहतुकीचा मार्ग,
राखूया सगळे मिळून हा असो संकल्प जागृत भार्ग.

भद्रावती नगरी, तुझी ओळख मोठी,
सुगंधी चर्चा असो पण मर्यादा खोटी नकोच होती.
हास्य, विनोद, गप्पांचा फड,
पण शिस्तीचा राहो कायम गड!

समाप्त

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!