Saturday, June 6, 2026
Homeभद्रावतीमध्यरात्री धाड टाकत ५ रेती ट्रॅक्टर जप्त; तालुक्यात चर्चा रंगल्या

मध्यरात्री धाड टाकत ५ रेती ट्रॅक्टर जप्त; तालुक्यात चर्चा रंगल्या

सिंदेवाहीत ‘महसूल’ झोपेत, ‘उपविभागीय’ जागे!

चंद्रपूर न्यूज डेस्क,

सिंदेवाही प्रतीनीधी

सचिन रामटेके✍️

सिंदेवाही तालुक्यात अनेक महिन्यांपासून रेती व मुरुमाचा अवैध उपसा सुरू असल्याच्या चर्चा रंगत असतानाच अखेर शुक्रवारी (दि. २०) मध्यरात्री प्रशासन जागे झाले आणि धाड टाकून ५ रेती ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. चिमूरचे उपविभागीय दंडाधिकारी स्वतः मैदानात उतरल्याने कारवाईला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले.

प्रसंगी तालुक्यातील नदीपात्रांमध्ये रेतीचा उपसा सुरू असल्याच्या चर्चा गावागावात होत होत्या. “रेती जाते, ट्रॅक्टर धावतात, पण कारवाई मात्र दिसत नाही,” अशी कुजबुजही सुरू होती. मात्र एका रात्रीतच ५ ट्रॅक्टर पकडले गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांनी नायब तहसीलदार व तलाठी यांच्यासह सापळा रचत ही कारवाई केली. जप्त ट्रॅक्टर तहसील कार्यालयात उभे करण्यात आले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, काही जप्त वाहनांमागे राजकीय छटा असल्याची चर्चा रंगली असली तरी अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यामुळे तालुक्यात “कारवाईचा पुढचा भाग काय?” यावर चर्चा झडत आहेत.

याशिवाय नागरिकांमध्ये मात्र मिश्कील सूर ऐकू येत आहेत “एक रात्रीत ५ ट्रॅक्टर सापडले, म्हणजे शोधायचे ठरवले तर अजून किती सापडतील?” आता ही कारवाई सातत्याने सुरू राहते की काही दिवसांनी पुन्हा शांतता पसरते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!