पोलीस अधिकारी सचिन खेत्रे साहेबांचा दणका! अवैध धंदेवाल्यांची पळापळ; घोडपेठमधील विनापरवाना दारूविक्रीवरही कारवाई
जुगार-सट्टा, खर्रा, तंबाखूजन्य पदार्थ, अमली पदार्थांवर कारवाईचा धडाका; ‘धंदा बंद की बस्ता बांधा?’ अशी अवैध व्यावसायिकांची अवस्था
भद्रावती, न्यूज डेस्क
शंकर बोरघरे
95 52 61 25 55
तालुक्यात अवैध धंद्यांविरोधात पोलीस अधिकारी सचिन खेत्रे साहेबांनी कारवाईचा धडाका सुरू केल्याने अवैध व्यवसायिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. जुगार-सट्टा, खर्रा, तंबाखूजन्य पदार्थ, अमली पदार्थ तसेच विनापरवाना दारूविक्रीविरोधात पोलिसांची मोहीम सुरू असल्याने ‘साहेबांचा पुढचा नंबर कुणाचा?’ अशी चर्चा अवैध धंदेवाल्यांमध्ये रंगू लागली आहे.
‘साहेब आले’ म्हणताच अड्ड्यांवर शांतता!
कालपर्यंत बिनधास्त सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर पोलिसांची नजर पडताच काहींच्या ‘धंद्याची गती’ मंदावल्याचे चित्र आहे. कारवाईच्या भीतीने अड्डे सांभाळायचे की थेट बस्ता बांधायचा, असा प्रश्न संबंधितांना पडल्याची चर्चा परिसरात आहे.
घोडपेठमध्ये विनापरवाना दारूविक्रीलाही ब्रेक
या कारवाईदरम्यान घोडपेठ परिसरातील विनापरवाना सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीविरोधातही पोलिसांनी कारवाई केली. त्यामुळे अवैध दारूविक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, पोलिसांच्या धडक मोहिमेचा परिणाम स्पष्टपणे दिसून येत आहे.
‘धंदा बंद की बस्ता बांधा?’
पोलीस अधिकारी सचिन खेत्रे यांच्या कारवाईमुळे अवैध व्यवसायिकांमध्ये सध्या एकच प्रश्न चर्चेत असल्याचे चित्र आहे “पुढचा नंबर आपला तर नाही ना?”
तर नागरिकांमध्ये मात्र समाधानाचे वातावरण असून, अवैध जुगार, सट्टा, खर्रा, तंबाखूजन्य पदार्थ, अमली पदार्थ आणि विनापरवाना दारूविक्रीविरोधातील ही मोहीम अशीच सुरू राहावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पुढील भागात आणखी उलगडा…
भद्रावती तालुक्यातील अवैध धंद्यांविरोधात सुरू झालेल्या या कारवाईने आता वेगळेच चित्र निर्माण केले आहे. कुठे कोणता अवैध धंदा सुरू आहे, कोणाच्या आशीर्वादाने तो सुरू आहे आणि पोलिसांच्या रडारवर आता कोणता परिसर येणार? याबाबतची चर्चा जोर धरू लागली आहे.
घोडपेठमधील विनापरवाना दारूविक्रीवरील कारवाईनंतर आता तालुक्यातील इतर संशयित ठिकाणांकडेही नागरिकांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे सचिन खेत्रे साहेबांच्या या धडक मोहिमेत पुढे आणखी कोणते गैरप्रकार उघडकीस येतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
शेवटचा इशारा स्पष्ट!
अवैध धंदे करणाऱ्यांनी पोलिसांच्या कारवाईला कमी लेखू नये, तर नागरिकांनीही अशा गैरप्रकारांची माहिती संबंधित यंत्रणेला देऊन सहकार्य करावे. कायद्याच्या चौकटीत होणारी सातत्यपूर्ण कारवाईच अवैध धंद्यांना आळा घालण्याचा प्रभावी मार्ग ठरू शकते.
सध्या भद्रावतीत एकच चर्चा रंगली आहे
‘खेत्रे साहेबांचा दणका सुरू आहे… आता पुढचा नंबर कोणाचा?’
ही मोहीम अशीच सुरू राहिली, तर अवैध धंदेवाल्यांना ‘धंदा’ नव्हे, तर कायद्याचीच आठवण ठेवावी लागेल!


