भद्रावती (प्रतिनिधी):-भद्रावती नगरपरिषद निवडणुकीचा निकाल लागला आणि एक गोष्ट साफ झाली,
यावेळी मतदारांनी सगळ्या राजकीय पक्षांना चांगलाच धडा शिकवला आहे.
माहीतगारांच्या मते, हा निकाल कुण्या एकाच पक्षाचा विजय नाही आणि कुण्या एकाचा पराभवही नाही;
तर सगळ्याच पक्षांना लागलेली जोराची बोच आहे.
नेते भाषणात, कार्यकर्ता रस्त्यावर, निकाल ठरवला रस्त्याने..!
यावेळी मतदारांनी सरळ सांगितलं,
“फक्त नाव मोठं म्हणून मत नाही,
काम केलंय का? माणसात बसलाय का? हेच पाहिलं.”
ज्या प्रभागात कार्यकर्ता घराघरात फिरला, लोकांच्या अडचणी ऐकल्या, रस्त्यावर दिसला,
तिथेच बाजी मारली गेली.
आणि जिथं फक्त पोस्टर, बॅनर, भाषण आणि अहंकार होता,
तिथं मोठमोठे नेतेही धुळीला मिळाले.
सगळ्यांनाच फक्त सत्ताधारी असो की विरोधक..
माहीतगार सांगतात,
सत्ताधाऱ्यांना वाटलं “आपोआप मत मिळेल”,
विरोधकांना वाटलं “फक्त टीका पुरेशी आहे”
पण मतदारांनी दोघांनाही सांगितलं,
“काम नसेल तर मत नाही.”
जुने चेहरे, वर्षानुवर्षे खुर्चीत बसलेले लोक,
यावेळी अनेक ठिकाणी घरचा रस्ता पाहायला लागले.
काम करणारा माणूस पुढं, नावावर चालणारे मागं
या सगळ्या निकालात एक गोष्ट ठळक दिसली ….
काम करणारा, लोकांत राहणारा, माणसात बसणारा माणूस लोकांना हवा आहे.
त्याच पार्श्वभूमीवर खेळाडू व समाजात वावरणारा माणूस म्हणून ओळख असलेले
प्रफुल चटकी
नगराध्यक्षपदी निवडले जाणे, हे लोकांचा बदलता मूड दाखवतं.
पुढच्या राजकारणाला सरळ इशारा..!
राजकीय माहीतगार ठाम सांगतात..
हा निकाल म्हणजे पुढच्या निवडणुकांचा ट्रेलर आहे.
आता प्रत्येक पक्षाला
कार्यकर्त्याला मान द्यावा लागेल
गटबाजी थांबवावी लागेल
आणि खरंच कामाला लागावं लागेल
नाहीतर पुढच्या वेळी मतदार आणखी जोरात धडा शिकवतील.
थोडक्यात काय तर,
भद्रावतीचा निकाल सगळ्या पक्षांना बोच देणारा,
आणि कार्यकर्त्याला राजा बनवणारा ठरला आहे….!
- रस्त्यावरील झाडे अपघातांचे कारण;प्रशासनाचे दुर्लक्ष..!
- नामुचा “डल्ला” ठेकेदार-दारू विक्रेत्यांकडून “उत्साह” चा “फंड”..!
- भद्रावती आंबेडकरी राजकारणात संभ्रम; बी.एस.पी. व वंचित बहुजन आघाडीची भूमिका अस्पष्ट
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- विस वर्षांनंतर लोकमान्य विद्यालयाच्या वर्गमित्रांचा भावनिक पुनर्मिलन समारंभ
- जुन्या कार्यकर्त्यांना डावलून स्वयंघोषित नाम्यांच्या “डल्ला” प्रकरणावर नारीशक्तीने ठोस निषेध..
- भद्रावतीतील नाम्याचा राजकीय विस्फोट…! ज्येष्ठांचा विश्वासघात, अवैध व्यवसायांचा आधार, आणि पक्षांतर्गत वाढते वाद..! नाम्याचा “डल्ला” ..! स्वयंघोषित नेतृत्वाने भद्रावतीत वादांचा वाढता पाऊस…
- भद्रावती नगरपरिषद निवडणूक; प्रभाग ७ मध्ये इम्रान खान हे संभाव्य नगरसेवक म्हणून चर्चेत…!
- “त्या” पक्षातील पारदर्शकतेवर जुन्या निष्ठावंतांचा भडकता ऐल्गार..! नाम्या यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह..!


