भद्रावती (प्रतिनिधी) :–वार्डातील समस्यांवर पाच वर्षे गायब राहून आता अचानक ‘सेवाभावी देवदूत’ बनून फिरणाऱ्या डेमो नावाच्या पात्राला नागरिकांनी जबरदस्त रोखठोक धुलाई दिली आहे.
त्यातही एक मतदाराने मारलेला “२४ तास सेवा की २४ तास ?” हा टोला सध्या सर्वत्र व्हायरल झाला असून भद्रावतीत चर्चेचा भडका उडाला आहे!
घटनास्थळ एका वार्डातील गल्ली
डेमो करीता , मतदारराजा सवालासाठी सज्ज!
डेमो हातोजोड नागरिकांपुढे गोड बोलत उभा रहाणार प्रश्न एक ज्येष्ठ मतदार पुढे येत म्हणणार..
“अहो डेमो साहेब..
तुम्ही म्हणता २४ तास सेवा केली?
मग आम्ही तर ऐकलंय की तुम्ही २४ तास दुसऱ्याच सेवेत…का!
हा होणारा सर्वोत्तम “डेमाला” प्रश्न..!
क्षणात डेमोचा हास्यमुख चेहरा बद्दल विडिओ करणारा विचारतो
आजूबाजूला उपस्थित नागरिकांचा हशा आणि हातातल्या मोबाईलवर चालू व्हिडिओ
क्षणात वार्डभर पसरला!
लोकांचा रोखठोक प्रतिसाद :
“व्यसनात बुडून सेवा कशी करता?”
एका तरुणाने थेट बोलला,,
“रस्ते खड्ड्यांनी भरले असताना डेमो कुठे गायब झाला जसे डोळ्यांसह कुठे दिसायचा नाही?
आणि आज म्हणतो २४ तास सेवा!”
महिलांनीही तिखट प्रतिक्रिया दिली,
“काम नको, फोटो नको, गोड बोलणे नको…
जो स्वतःलाच नियंत्रणात ठेवू शकत नाही, तो वार्ड चालवणार?”
मागील बातमीत उल्लेखलेल्या ‘गायबगिरी’ नारीशक्ती वर उठला जुना प्रश्न उपस्थित होणार..
ज्याप्रमाणे पाच वर्षे डेमोचे,,रस्ते समस्यांवर दर्शन नाही
,पाणीटंचाईच्या वेळी फोन नाही
,गटारप्रश्नी आवाज नाही, वार्डासाठी कोणतीही लढाई नाही
त्या सर्व वर आता एक नवीन चर्चा चिघळली आहे
“डेमो ने सेवा केलीच नाही… फक्त व्यसनेच सांभाळली!”
मतदारांचा उग्र सूर,
“बेपत्ता नेता + व्यसन = शून्य सेवा!”
चौकात, चहाच्या दुकानी, बसस्टँडवर एकच चर्चेचा मुद्दा.
डेमोवर उठलेली मोठी शंका:
“वार्डाचा कारभार हातात देतोय की रात्रभर व्यसनात बुडून जाणारा?”
तरुणांनी तर पोस्टरबाजीला थेट चॅलेंज दिले.
“डेमो, काम दाखवा… नाहीतर तुमच्या व्यसनाची झलक आम्ही दाखवू!”
डेमोची टीम हादरली ,मतदारांचे प्रश्न टाळत पळ काढला
व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून डेमोची टीम पूर्णपणे पॅनिक मोडमध्ये.
उत्तर द्यायचे तर पुरावे नाहीत,
नकार द्यायचा तर नागरिकांकडे अनुभव जास्त.
लोक म्हणतात
“डेमोचा खरा ट्रॅक रेकॉर्ड हा आहे…
सेवा नाही, व्यसन आहे!”
भद्रावतीचा कडक इशारा :
“या वेळेस डेमो नको… सेवक हवा!”
शेवटी नागरिकांनी स्पष्ट सांगितले
“मतदान म्हणजे विनोद नाही.
जो स्वतःला सांभाळू शकत नाही,
तो १०,००० लोकांना काय सांभाळणार?”
या एका टोळ्याने
“२४ तास सेवा की २४ तास व्यसन?”
डेमोची प्रतिमा अक्षरशः हादरली असून वार्डातील सर्वात चर्चेत असलेली बातमी ठरली आहे.


