Saturday, June 6, 2026
Homeचंद्रपूरनगराध्यक्ष पदाकरीता डॉ. विशाल शिंदे यांच्या उमेदवारीला घरोघरी उत्स्फूर्त प्रतिसाद..!

नगराध्यक्ष पदाकरीता डॉ. विशाल शिंदे यांच्या उमेदवारीला घरोघरी उत्स्फूर्त प्रतिसाद..!

भद्रावती नगर परिषद निवडणुकीत आम आदमी पक्षाची जोरदार एन्ट्री
नगराध्यक्ष पदाकरीता डॉ. विशाल शिंदे यांच्या उमेदवारीला घरोघरी उत्स्फूर्त प्रतिसाद..!

भद्रावती (प्रतिनिधी) :आगामी नगर परिषद निवडणुकीत भद्रावतीच्या राजकारणात नव्या बदलाची नांदी वाजली असून, आम आदमी पक्षाने शहरातील प्रतिष्ठित शिक्षणतज्ज्ञ, क्रीडाक्षेत्रातील मार्गदर्शक आणि सामाजिक कार्याची भक्कम परंपरा असलेल्या डॉ. विशाल नीलकंठराव शिंदे यांची नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली आहे. या घोषणेनंतर शहरभर उमेदवारीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून, घरोघरी झालेल्या संवाद मोहिमेत नागरिकांनी डॉ. शिंदे यांच्या नेतृत्वावर ठाम विश्वास व्यक्त केला आहे.
बहुआयामी व्यक्तिमत्त्व, शिक्षण, क्रीडा आणि समाजकारणाचा संगम
RTM नागपूर विद्यापीठातून एम.ए. (मराठी), एम.ए. (राजकीयशास्त्र), बी.पी.एड., एम.पी.एड. आणि पीएच.डी. (शारीरिक शिक्षण) अशा उच्च शिक्षणाची घौदंड मिळवलेले डॉ. शिंदे सध्या नीलकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयात क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक म्हणून कार्यरत आहेत.
११ वर्षे ७ महिन्यांचा अध्यापन अनुभव, गोंडवाना विद्यापीठातील पीएच.डी. मार्गदर्शक म्हणूनचे योगदान आणि शिक्षणविश्वातील त्यांची मजबूत प्रतिष्ठा भद्रावतीसाठी एक मोठी संपत्ती मानली जाते.
क्रीडा क्षेत्रातील अभूतपूर्व योगदान म्हणून चंद्रपूर जिल्हा तायक्वांडो संघाचे अध्यक्ष, विद्यार्थी युवक क्रीडा मंडळाचे अध्यक्ष, विदर्भ एमेच्योर कबड्डी असोसिएशनची रेफरी परीक्षा उत्तीर्ण, तायक्वांडो ब्लॅक बेल्ट (१४ मार्च २०२१)
रोलर स्केटिंग राज्य स्पर्धेत रौप्यपदक विजेते,
स्केटिंग हॉकी, स्पीड स्केटिंग, रोलर हॉकी मध्ये राज्यस्तरीय सहभाग
त्यांच्या मार्गदर्शनाखाली ४७८ खेळाडूंनी विविध अखिल भारतीय व आंतरविद्यापीठ स्पर्धांत भद्रावतीचे प्रतिनिधित्व केले असून, सर्व खेळाडूंना रंगीत कोट मिळवून देण्याचा मानही त्यांच्याच नावावर आहे.
साहित्य व संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य
३ पुस्तके लेखन,
१० आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय, संशोधन लेख, १८ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग,
त्यामुळे त्यांचे संशोधन कार्य आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता पावले आहे.
प्रसंगी राजकारणात स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार असणार म्हणून,
आम आदमी पक्षाने डॉ. शिंदे यांच्या उमेदवारीची घोषणा करताना स्पष्ट केले की,
“स्वच्छ राजकारण, पारदर्शक प्रशासन आणि भद्रावतीचा सर्वांगीण विकास” हा त्यांचा मूलमंत्र असेल.
शिक्षण, संस्कार, क्रीडा व समाजकारण या चारही क्षेत्रांत डॉ. शिंदे यांची मजबूत उपस्थिती असल्याने शहरातील सर्व घटकांपर्यंत त्यांचे जाळे पोहोचलेले आहे. त्यामुळे त्यांना मिळणारा घरोघरी प्रतिसाद हीच जनतेच्या विश्वासाची पावती ठरत आहे.
पुरस्कार आणि सन्मानपूर्वक,
डॉ. शिंदे यांना स्वामी विवेकानंद सरस्वती राज्य युवा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे, जे त्यांच्या प्रतिभा, परिश्रम आणि सामाजिक बांधिलकीचे अधिकृत मानांकन आहे.
पक्षाचा दृढ विश्वास , “भद्रावतीला मिळणार सक्षम नेतृत्व”
आम आदमी पक्षाने म्हटले आहे की,
“डॉ. विशाल शिंदे हे शिक्षण, क्रीडा, सामाजिक बांधिलकी आणि पारदर्शक प्रशासन या चौघांचा समतोल साधणारे सक्षम नेतृत्व आहे. भद्रावतीच्या विकासासाठी तेच योग्य पर्याय आहेत.”
नागरिकांचे समर्थन, त्यांच्या कार्याचा मजबूत अनुभव आणि पक्षाचा स्पष्ट विकासदृष्टिकोन यामुळे भद्रावतीच्या निवडणुकीत डॉ. शिंदे यांची उमेदवारी हा चर्चेचा प्रमुख विषय ठरला आहे.
या उमेदवारीमुळे भद्रावतीच्या राजकारणात नवा अध्याय सुरु झाला असून शहराच्या सर्वांगीण विकासाची नवी आशा आकार घेत आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!