Friday, April 17, 2026
Homeभद्रावतीस्वीकृती मिळो वा न मिळो… सेवा मात्र थांबणार नाही! AAPचे डॉ. शिंदे”

स्वीकृती मिळो वा न मिळो… सेवा मात्र थांबणार नाही! AAPचे डॉ. शिंदे”

🔥 रोखठोक प्रभावी उत्तर) 🔥

“कमीशनखोरीला सडेतोड उत्तर… मी लोकसेवेसाठीच!
डॉ. विशाल शिंदे”

“निष्ठावंतांना डावलणाऱ्या राजकारणावर थेट प्रहार; डॉ. शिंदेंचे घणाघाती भाषण”

“जनतेचा सेवक म्हणूनच राहणार; नगराध्यक्षपद नाही तर सेवा मोठी, डॉ. विशाल शिंदे”

भद्रावती (प्रतिनिधी):- नगरपरिषद निवडणुकीचा माहोल तापत असताना आम आदमी पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. विशाल शिंदे यांनी प्रचंड गर्दीसमोर दमदार आणि थेट भाषण करत वातावरण ढवळून काढले.
सभेत बोलताना त्यांनी सडेतोड शब्दांत म्हटले,
“सेवेच्या नावाखाली फोफावलेली कमीशनखोरी, दलाली आणि स्वतःचे खिसे भरणारे राजकारण आता बदलण्याची वेळ आली आहे. मी समाजकारणातून राजकारणात आलो आहे. मायबाप मतदारांनी मला नगराध्यक्ष म्हणून स्वीकारले तरीही..!आणि नाही स्वीकारले तरीही..!मी फक्त व फक्त लोकसेवेसाठीच उभा राहीन.”
डॉ. शिंदेंनी पुढे मोठा आरोप करत म्हटले,
“राष्ट्रीय स्तरावरील पक्षांमध्ये लाखो-करोडो कार्यकर्ते असतात, पण निष्ठावंतांना डावलण्याची प्रवृत्ती वाढली आहे. अशा राजकारणाला मी नकार दिला. आम आदमी पक्षात काम करणाऱ्याला मान आहे, संधी आहे आणि खऱ्या अर्थाने पारदर्शक राजकारण आहे. म्हणूनच मी AAP ची उमेदवारी घेतली.”
त्यांच्या कठोर शब्दांनी उपस्थितांमध्ये उत्साहाचे वारे पसरले असून, त्यांच्या भाषणाची चर्चा भद्रावतीत सर्वत्र रंगली आहे. आगामी निवडणुकीत ही लढत अधिक रंगतदार होणार असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!