“तीघांची उमेदवारी वेगवेगळ्या प्रभागातून… पण ‘आपला’ वार्डाचा आपला सेवक!”
भद्रावती (प्रतिनिधी):-वार्डातीतील निवडणुकीचा माहोल एवढा तापला आहे की पोस्टरपेक्षा लोक फोनमध्ये ‘उमेदवार कुठून उभा आहे?’ हे चेक करताना दिसताहेत.
कारण; तीन्ही उमेदवार एकाच भागात राहणारे… पण उभे मात्र तीन तिकडून!
एक म्हणतो,
“मी प्रभाग ११…मोठी दृष्टी, मोठी स्वप्नं!”
मतदार हसून म्हणतात,
“मोठी दृष्टी ठीक… पण घरच्या गल्लीवरचा खड्डा दिसून येत आधी!”
दुसरा म्हणतो,
“मी प्रभाग १४..विकास कुठेही करू!”
लोकांचे उत्तर भारी,
“अहो कुठेही नाही… आधी इथेच करा ना!”
तिसरा मात्र शांत… साधा… पण लोकांच्या डोळ्यात चमक आणणारा..!
प्रभाग १३चा मूळ रहिवासी!
बॅनर कमी, काम जास्त.
डायलॉग नाही, थेट काम.
लोक तर थेट म्हणतायत..!
“बाकी उमेदवार प्रभाग-भ्रमंती करतात…
पण हा? लोकांच्या मनात स्थिर बसलाय!”
एका महिलेनं कमालीची ओळ दिली.
“बाबांनो, बाकी उमेदवार आले-गेले…
पण हा तर रोज इथेच दिसतो!
हाच आपला लोकल हिरो!”
एका तरुणाने तर मजेशीर टिप्पणी केली.
“इतर उमेदवार टूरवर…
आणि हा १३ प्रभागाचा उमेदवार?
आपल्या वार्डातीतील ‘ओरिजिनल उमेदवार ’!”
जेष्ठ नागरिक म्हणतात,
“उभा जिथून, राहतोही तिथून…
समस्या आपल्या, माणूसही आपलाच…
हाच हिरो सर!”
भद्रानाग वार्डातीतील एकदम एकच चर्चा
“तीघांची उमेदवारी वेगवेगळ्या प्रभागातून…
पण हिरो फक्त एक; आपला प्रभाग १३चा!”


