Friday, April 17, 2026
Homeभद्रावतीभद्रावतीत स्टार प्रचारकांची मेगा सभा; ग्रामीण भागाची प्रचंड गर्दी..!

भद्रावतीत स्टार प्रचारकांची मेगा सभा; ग्रामीण भागाची प्रचंड गर्दी..!

भद्रावती (प्रतिनिधी):-नगर परिषद निवडणुकीचा ताप वाढत असताना भद्रावतीत घेण्यात आलेल्या मेगा सभेला राज्यातील ज्येष्ठ नेते आणि स्टार प्रचारकांची उपस्थिती राहिली.
या सभेला आलेल्या नेत्यांनी आपल्या भाषणांतून विरोधकांवर जोरदार टीका करत, “यंदाची निवडणूक निर्णायक असेल” असे मतदारांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर, नगरपालिकेच्या विकासकामांची आखणी आणि भविष्यातील योजनांची आखणी यावर भर देण्यात आला.
मात्र, या सभेची सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे शहरातील नागरिकांच्या तुलनेत ग्रामीण भागातील मतदारांचीच प्रचंड गर्दी पाहायला मिळाली.
सभास्थळी सुरूवातीपासूनच ‘हाऊसफुल’ वातावरण निर्माण झाले होते. मोठे बॅनर, ढोल-ताशांचा गडगडाट आणि घोषणांच्या गजराने परिसर दणाणून गेला.
ग्रामीण भागातील महिला, तरुण आणि वृद्ध नागरिकांची उत्साही उपस्थिती या सभेच्या विशेष ओळखीचे ठरली.
सभेला आलेल्या नेत्यांनी विरोधकांवर जोरदार टीका करत, भाजप, काँग्रेस, शिवसेना शिंदे गट, शिवसेना उबाठा, बसपा आणि आम आदमी पक्षासह अनेक पक्षांच्या उमेदवारांनी आपल्या भाषणांतून आपल्या विकास योजना आणि नगरपालिकेच्या भविष्यावर भर दिला.
त्यांनी “यंदाची निवडणूक निर्णायक असेल” असे मतदारांना पटवून देण्याचा प्रयत्न केला.
शहरी मतदारांची कमी उपस्थिती आणि ग्रामीणांच्या सळसळत्या सहभागामुळे राजकीय वर्तुळात खमंग चर्चा सुरू झाली आहे. कोणाचा कल कुठे? मतदान कोणाच्या बाजूला जास्त झुकतंय? यावर गल्लीबोळात कुजबुज रंगली आहे.
सभेच्या शेवटी ग्रामीण मतदारांनी केलेला उत्स्फूर्त सहभाग पाहून अनेक पक्ष कार्यकर्त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसल्याचे दिसून आले.
भद्रावती नगर परिषद क्षेत्रातील एकूण मतदारांची संख्या 52,572 असून, यात स्त्री मतदार 26,557 आणि पुरुष मतदार 26,015 आहेत.
एकूण 63 मतदान केंद्रे आहेत.
निवडणुकीच्या तारखा जवळ येत असताना निवडणूक आयोगाने सर्व मतदान केंद्रांची पाहणी केली आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भद्रावती येथे स्ट्राँग रूम आणि मतमोजणी कक्षाची देखील पाहणी करण्यात आली आहे.
भद्रावती नगर परिषदेत नगराध्यक्षपदासाठी शिवसेना (शिंदे गट) गटाचे प्रफुल चटकी यांच्या विरुद्ध भाजपचे अनिल धानोरकर सह काँग्रेसचे उमेदवार सुनील नामोजवार यांच्यात काट्याची लढत होणार आहे.
त्याचबरोबर शिवसेना शिंदे गट, शिवसेना उबाठा, बसपा आणि आम आदमी पक्षाचे उमेदवारही मैदानात आहेत.
ग्रामीण भागातील मतदारांचा उत्साह आणि शहरी भागातील नागरिकांची कमी उपस्थिती यामुळे निवडणूकीच्या निकालावर ग्रामीण भागाचा मोठा प्रभाव पडणार असल्याचे दिसून येत आहे.
या सभेनंतर राजकीय वर्तुळात ग्रामीण भागाच्या भूमिकेवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येत आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!