पाटाळा (भद्रावती तालुका) प्रतिनिधी :-
घरामध्ये विषारी सापाची पिल्ले व अंडी आढळणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जाते.
भद्रावती तालुक्यातील पाटाळा गावात अशीच अंगावर शहारे आणणारी घटना घडली असून, एका घरात कोब्रा नाग या अतिविषारी सापाची ७ पिल्ले व ९ अंडी आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
भद्रावती तालुक्यातील पाटाळा येथील रहिवासी राजू खरवडे यांच्या घरात मार्गशीर्ष महिन्यानिमित्त पूजा असल्याने घराची साफसफाई सुरू होती.
यावेळी घरातील कुलर व धान्य साठविण्यासाठी ठेवलेल्या माच (ड्रम)च्या मागील बाजूस अचानक सापाची ७ पिल्ले व ९ अंडी दिसून आली. हे दृश्य पाहताच घरातील सदस्य घाबरून गेले.
प्रसंगी घटनेनंतर घरातील सदस्यांनी तात्काळ सर्पमित्र संदीप जीवणे यांना फोन करून सापाची पिल्ले व अंड्यांचे फोटो पाठविले. फोटो पाहताच संदीप जीवणे यांनी ही पिल्ले व अंडी कोब्रा नागाची असल्याची प्राथमिक माहिती दिली तसेच पिल्लांची आई साप परिसरात असण्याची शक्यता असल्याने विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला दिला.
यानंतर सर्पमित्रांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत सावधपणे दिवसभर रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आले. सर्व ७ पिल्ले व ९ अंडी सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात आली व त्यानंतर त्यांना वर्धा नदी परिसरातील नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
या घटनेत कोणतीही जीवितहानी न होता वेळेवर कारवाई झाल्याने मोठा अनर्थ टळला. यावेळी सर्पमित्र संदीप जीवणे यांनी नागरिकांना आवाहन केले की, घरात किंवा परिसरात साप, सापाची पिल्ले अथवा अंडी आढळल्यास घाबरून न जाता तात्काळ वन विभाग किंवा प्रशिक्षित सर्पमित्रांशी संपर्क साधावा.
- रस्त्यावरील झाडे अपघातांचे कारण;प्रशासनाचे दुर्लक्ष..!
- नामुचा “डल्ला” ठेकेदार-दारू विक्रेत्यांकडून “उत्साह” चा “फंड”..!
- भद्रावती आंबेडकरी राजकारणात संभ्रम; बी.एस.पी. व वंचित बहुजन आघाडीची भूमिका अस्पष्ट
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- विस वर्षांनंतर लोकमान्य विद्यालयाच्या वर्गमित्रांचा भावनिक पुनर्मिलन समारंभ
- जुन्या कार्यकर्त्यांना डावलून स्वयंघोषित नाम्यांच्या “डल्ला” प्रकरणावर नारीशक्तीने ठोस निषेध..
- भद्रावतीतील नाम्याचा राजकीय विस्फोट…! ज्येष्ठांचा विश्वासघात, अवैध व्यवसायांचा आधार, आणि पक्षांतर्गत वाढते वाद..! नाम्याचा “डल्ला” ..! स्वयंघोषित नेतृत्वाने भद्रावतीत वादांचा वाढता पाऊस…
- भद्रावती नगरपरिषद निवडणूक; प्रभाग ७ मध्ये इम्रान खान हे संभाव्य नगरसेवक म्हणून चर्चेत…!
- “त्या” पक्षातील पारदर्शकतेवर जुन्या निष्ठावंतांचा भडकता ऐल्गार..! नाम्या यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह..!


