Saturday, June 6, 2026
Homeभद्रावतीघरात साप नाही, थेट किंग कोब्राचा थरार!; संदीप जीवणे यांच्या धाडसी रेस्क्यूमुळे...

घरात साप नाही, थेट किंग कोब्राचा थरार!; संदीप जीवणे यांच्या धाडसी रेस्क्यूमुळे मोठा अनर्थ टळला..!

 (माजरी):- प्रतिनिधी 
भद्रावती तालुक्यातील माजरी पाटाळा गावात अंगावर शहारे आणणारी घटना घडली आहे. एका घरामध्ये किंग कोब्रा या अतिविषारी सापाची ७ पिल्ले व ९ अंडी आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र सर्पमित्र संदीप जीवणे यांच्या तत्परता व धाडसामुळे मोठी दुर्घटना टळली.
पाटाळा येथील रहिवासी राजू खरवडे यांच्या घरात मार्गशीर्ष महिन्यानिमित्त पूजा व घराची साफसफाई सुरू असताना, घरातील कुलर व धान्य साठवण्यासाठी ठेवलेल्या ड्रामच्या मागील बाजूस सापाची पिल्ले व अंडी दिसून आली. हे दृश्य पाहताच घरातील सदस्य घाबरून गेले व तात्काळ मदतीसाठी संपर्क साधण्यात आला.
घटनेचे गांभीर्य ओळखून अनुभवी सर्पमित्र संदीप जीवणे घटनास्थळी दाखल झाले. पाहणीअंती त्यांनी ही पिल्ले व अंडी किंग कोब्रा या अत्यंत विषारी व दुर्मिळ सापाची असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर अत्यंत संयम, कौशल्य आणि धाडस दाखवत संपूर्ण दिवस रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आले.
जीव धोक्यात घालून संदीप जीवणे यांनी ७ पिल्ले व ९ अंडी सुरक्षितपणे ताब्यात घेतली. त्यांच्या वेळेवर केलेल्या हस्तक्षेपामुळे घरातील कुटुंबीयांसह शेजारील नागरिक मोठ्या संकटातून वाचले. या धाडसी कार्याबद्दल परिसरात त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नंतर ही सर्व पिल्ले व अंडी वर्धा नदी परिसरातील नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आली. या घटनेतून सर्पमित्रांचे समाजातील महत्त्व स्पष्ट झाले आहे.
आवाहन….!
यावेळी सर्पमित्र संदीप जीवणे यांनी नागरिकांना आवाहन केले की,
“घरात किंवा परिसरात साप, सापाची पिल्ले किंवा अंडी आढळल्यास घाबरून न जाता कोणतीही छेडछाड करू नये किंवा साप मारण्याचा प्रयत्न करू नये. तात्काळ प्रशिक्षित सर्पमित्र किंवा वन विभागाशी संपर्क साधावा. वेळीच माहिती दिल्यास मानव आणि साप दोघांचेही प्राण सुरक्षित राहतात.”

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!