Saturday, April 18, 2026
Homeचंद्रपूरअवैध सावकारांवर पोलिसांचा धडाका; चंद्रपूर जिल्हा पोलिसांची संवेदनशील व धाडसी कारवाई..! डायल...

अवैध सावकारांवर पोलिसांचा धडाका; चंद्रपूर जिल्हा पोलिसांची संवेदनशील व धाडसी कारवाई..! डायल ११२…….

चंद्रपूर (प्रतिनिधी):–अवैध सावकारांच्या जाचातून सामान्य नागरिकांची मुक्तता करण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलिसांनी पुन्हा एकदा आपली कर्तव्यनिष्ठा, संवेदनशीलता व कार्यक्षमता सिद्ध केली आहे. पोलिसांनी केलेल्या जाहीर आवाहनाला नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादानंतर ब्रह्मपुरी येथे अवैध सावकारीचा आणखी एक गंभीर गुन्हा उघडकीस आणत आरोपीविरोधात तत्काळ कारवाई करण्यात आली आहे.
दिनांक १९ डिसेंबर २०२५ रोजी प्राप्त तक्रारीनुसार, ब्रह्मपुरी येथील आरोपी लक्ष्मण पंडिलक उरकडे याने अवैधरीत्या कर्ज देत नागरिकांचे आर्थिक शोषण केल्याचा प्रकार समोर आला. तक्रारीची गंभीर दखल घेत ब्रह्मपुरी पोलिसांनी कोणताही विलंब न करता भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र सावकारी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
विशेष म्हणजे, पोलिसांनी यापूर्वी केलेल्या आवाहनामुळे पीडित नागरिक पुढे येऊ लागले असून, हेच पोलिस प्रशासनाच्या विश्वासार्हतेचे मोठे उदाहरण मानले जात आहे. आर्थिक शोषण, मानसिक दबाव व अवाजवी व्याजदरांच्या गर्तेत सापडलेल्या नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलिसांनी दाखवलेली तत्परता कौतुकास्पद आहे.
चंद्रपूर जिल्हा पोलिसांनी नागरिकांना पुन्हा एकदा स्पष्ट संदेश दिला आहे की,
“अवैध सावकारांविरोधात शून्य सहनशीलतेचे धोरण अवलंबले असून, कुणीही कायद्यापेक्षा मोठा नाही.”
अवैध सावकारी, जबरदस्तीने तारण, मुद्दलाच्या पटीत व्याज आकारणी किंवा शोषणाच्या कोणत्याही प्रकाराची माहिती नागरिकांनी डायल ११२ किंवा ७८८७८९०१०० या क्रमांकावर देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णतः गोपनीय ठेवली जाणार असल्याचेही पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
याशिवाय अवैध सावकारांविरोधातील ही ठोस कारवाई चंद्रपूर जिल्हा पोलिसांच्या सामाजिक बांधिलकीची आणि कायद्याच्या अंमलबजावणीतील दृढ इच्छाशक्तीची साक्ष देणारी ठरत आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!