Thursday, November 5, 2026
Homeचंद्रपूरलाचलुचपत प्रतिबंधक विभागातील उल्लेखनीय कामगिरी; अनिल जिट्टावार यांना प्रशस्तीपत्र!

लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील उल्लेखनीय कामगिरी; अनिल जिट्टावार यांना प्रशस्तीपत्र!

कर्तव्यनिष्ठ कार्यशैलीचा गौरव! चंद्रपूरचे पोलीस उपअधीक्षक अनिल जिट्टावार यांना प्रशस्तीपत्राने सन्मानित!

विदर्भ पाटबंधारे विकास विभागातील प्रलंबित चौकशांचा यशस्वी निपटारा; नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कामगिरीची विशेष दखल

चंद्रपूर , न्यूज डेस्क

शंकर बोरघरे, 95 52 61 25 55 

 

चंद्रपूर येथे कार्यरत असलेले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल जिट्टावार यांच्या कर्तव्यनिष्ठ आणि उल्लेखनीय कामगिरीची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष दखल घेत त्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले आहे. नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आल्याने पोलीस विभागात समाधान व्यक्त होत आहे.

तसेच विदर्भ पाटबंधारे विकास विभागाशी संबंधित विविध चौकशा पूर्ण करणे, दोषींविरुद्ध नियमानुसार गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पार पाडणे आणि दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा निपटारा करणे, अशी महत्त्वपूर्ण जबाबदारी जिट्टावार यांनी सक्षमपणे पार पाडली. या कामकाजादरम्यान त्यांनी गोपनीयता, अचूक नियोजन, बुद्धिकौशल्य आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाला प्राधान्य देत चौकशी प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली.

त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक डॉ. विजय प्रधान यांनी प्रशस्तीपत्र प्रदान करून त्यांचे कौतुक केले. कर्तव्याप्रती निष्ठा, प्रामाणिकपणा, कामातील तत्परता आणि जबाबदारीची जाणीव या गुणांची ही पोचपावती मानली जात आहे.

शासकीय यंत्रणेतील प्रलंबित प्रकरणांचा प्रभावी निपटारा करताना कायद्याच्या चौकटीत राहून काम करण्याची त्यांची कार्यपद्धती निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यांच्या या सन्मानामुळे चंद्रपूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालाही गौरव प्राप्त झाला असून, अनिल जिट्टावार यांच्यावर पोलीस विभागासह विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!