Thursday, November 5, 2026
Homeभद्रावतीमहसूल विभाग झोपेत, पारोधीकर मैदानात! गावकऱ्यांनीच पकडला रेतीचा ट्रॅक्टर; अधिकाऱ्यांना बोलावून लावला...

महसूल विभाग झोपेत, पारोधीकर मैदानात! गावकऱ्यांनीच पकडला रेतीचा ट्रॅक्टर; अधिकाऱ्यांना बोलावून लावला थेट तहसील कार्यालयात!

 रेती तस्करी रोखण्यासाठी ग्रामस्थच बनले ‘महसूल पथक’; खुशाल मस्के यांना पाचारण करून ट्रॅक्टर केला स्वाधीन!

भद्रावती, न्यूज डेस्क, शंकर बोरघरे, 95 52 61 25 55

        भद्रावती तालुक्यातील पारोधी गावात एक भन्नाट प्रकार घडला आहे. विनापरवाना रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करण्यासाठी महसूल विभागाची वाट पाहण्याऐवजी चक्क गावकऱ्यांनीच पुढाकार घेत ट्रॅक्टर पकडून ठेवला. त्यामुळे काही काळासाठी पारोधी गावात ग्रामस्थच महसूल विभाग बनल्याचे चित्र पाहायला मिळाले!

      विशेष म्हणजे, गावकऱ्यांनी ट्रॅक्टर पकडून केवळ हात झटकले नाहीत, तर थेट महसूल विभागाचे अधिकारी खुशाल मस्के यांना पाचारण केले. त्यानंतर पकडलेला ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यासाठी रवाना करण्यात आला.

       गावकऱ्यांनी ट्रॅक्टर पकडायचा, अधिकाऱ्यांना फोन करायचा आणि कारवाईसाठी पुढाकारही घ्यायचा; मग महसूल विभागाची गस्त नेमकी कुठे आहे? असा सवाल या घटनेनंतर उपस्थित होत आहे.

      रेती तस्करांना प्रशासनाचा धाक राहिला आहे की नाही, हा वेगळा प्रश्न; पण पारोधीकरांनी मात्र स्वतःच पुढाकार घेऊन अवैध वाहतुकीला लगाम घालण्याचा प्रयत्न केला आहे.

      आता प्रश्न एवढाच की, प्रत्येक गावात ग्रामस्थांनीच महसूल पथकाची भूमिका बजवायची का? की महसूल विभागही आपली जबाबदारी ओळखून प्रत्यक्ष मैदानात उतरणार?

पारोधीकरांच्या या कृतीने एक मात्र स्पष्ट केले. गावकरी जागे झाले की रेतीच्या ट्रॅक्टरचीही तहसीलवारी ठरलेली!

रोखठोक ; सत्याची धार… निर्भीड वार… जनतेचा आवाज…

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!