Friday, April 17, 2026
Homeभद्रावतीजनतेच्या विश्वासाची अधिकृत पावती; प्रफुल चटकी यांनी भद्रावती नगराध्यक्ष पदाचे प्रमाणपत्र स्वीकारले..!

जनतेच्या विश्वासाची अधिकृत पावती; प्रफुल चटकी यांनी भद्रावती नगराध्यक्ष पदाचे प्रमाणपत्र स्वीकारले..!

भद्रावती (प्रतिनिधी):-भद्रावती नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदावर निवडून आलेले प्रफुल चटकी यांनी आज अधिकृतरित्या नगराध्यक्ष पदाचे प्रमाणपत्र स्वीकारले. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीत हा प्रमाणपत्र वितरण सोहळा पार पडला.
नुकत्याच पार पडलेल्या भद्रावती नगर परिषद निवडणुकीत जनतेने दिलेल्या कौलावर शिक्कामोर्तब करत आज प्रफुल चटकी यांना नगराध्यक्ष पदाचे अधिकृत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या क्षणाने भद्रावतीच्या राजकीय वाटचालीत नवे पर्व सुरू झाल्याची भावना उपस्थितांमध्ये दिसून आली.
प्रमाणपत्र स्वीकारल्यानंतर नगराध्यक्ष प्रफुल चटकी यांनी शहरातील सर्व मतदारांचे आभार मानत,
“जनतेने दिलेला विश्वास ही मोठी जबाबदारी असून भद्रावती शहराच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणार,” असा निर्धार व्यक्त केला.
शहरातील नागरी सुविधा, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, विकासकामे तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत लोकाभिमुख प्रशासन देण्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
निवडणूक प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी तसेच मान्यवर यावेळी उपस्थित होते.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!