चंद्रपूर (प्रतिनिधी):- आदिवासी समाजाच्या संस्कृती रक्षण, शिक्षण, आरोग्य व सर्वांगीण विकासासाठी गेल्या ७३ वर्षांपासून कार्यरत असलेल्या विदर्भ वनवासी कल्याण आश्रम, जिल्हा चंद्रपूर यांचा स्थापना दिवस येत्या रविवार, २८ डिसेंबर २०२५ रोजी साजरा करण्यात येणार आहे.
या स्थापना दिनानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, सकाळी १०.३० वाजता कार्यक्रमास सुरुवात होणार आहे. हा कार्यक्रम न्यु ईंडिया काॅन्वेट गुरुद्वारा जवळ तुकूम चंद्रपूर येथे पार पडणार आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून मा. श्री. अनिलजी मरस्कोले (प्रांत सहसचिव) उपस्थित राहणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. तसेच मार्गदर्शक व प्रमुख अतिथी म्हणून विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व संघटन प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
विदर्भ वनवासी कल्याण आश्रम गेल्या अनेक दशकांपासून वनवासी व आदिवासी बांधवांच्या शिक्षण, आरोग्य, सामाजिक जागृती व सांस्कृतिक जतनासाठी सातत्याने कार्य करत असून, या कार्याचा आढावा व पुढील वाटचालीची दिशा या स्थापना दिन कार्यक्रमात मांडली जाणार आहे.
या कार्यक्रमास समाजातील सर्व स्तरातील नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी व हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
- रस्त्यावरील झाडे अपघातांचे कारण;प्रशासनाचे दुर्लक्ष..!
- नामुचा “डल्ला” ठेकेदार-दारू विक्रेत्यांकडून “उत्साह” चा “फंड”..!
- भद्रावती आंबेडकरी राजकारणात संभ्रम; बी.एस.पी. व वंचित बहुजन आघाडीची भूमिका अस्पष्ट
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- विस वर्षांनंतर लोकमान्य विद्यालयाच्या वर्गमित्रांचा भावनिक पुनर्मिलन समारंभ
- जुन्या कार्यकर्त्यांना डावलून स्वयंघोषित नाम्यांच्या “डल्ला” प्रकरणावर नारीशक्तीने ठोस निषेध..
- भद्रावतीतील नाम्याचा राजकीय विस्फोट…! ज्येष्ठांचा विश्वासघात, अवैध व्यवसायांचा आधार, आणि पक्षांतर्गत वाढते वाद..! नाम्याचा “डल्ला” ..! स्वयंघोषित नेतृत्वाने भद्रावतीत वादांचा वाढता पाऊस…
- भद्रावती नगरपरिषद निवडणूक; प्रभाग ७ मध्ये इम्रान खान हे संभाव्य नगरसेवक म्हणून चर्चेत…!
- “त्या” पक्षातील पारदर्शकतेवर जुन्या निष्ठावंतांचा भडकता ऐल्गार..! नाम्या यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह..!


