राजकारणात हाच नवा अध्याय का?
चंद्रपूर :-राजकारणात सध्या एकच चर्चा रंगली आहे.
काम करणारा बाजूला आणि संधी साधणारा पुढे, हाच काय नवा नियम झाला आहे का? वर्षानुवर्षे पक्षासाठी राबणारे, गावोगावी झेंडे उचलणारे, आंदोलनात पुढे उभे राहणारे निष्ठावंत कार्यकर्ते आजही तसेच दुर्लक्षित दिसत आहेत.
निवडणूक असो की आंदोलन, सभा असो की प्रचार..!
सगळीकडे निष्ठावंत कार्यकर्ता पुढे असतो. वेळ, पैसा, कुटुंब सगळं बाजूला ठेवून तो पक्षासाठी झटतो. पण जेव्हा पदे वाटायची वेळ येते, तिकीट द्यायचं असतं, किंवा सत्तेची खुर्ची ठरवायची असते, तेव्हा मात्र त्याच कार्यकर्त्याला “थांब जरा” असं सांगून बाजूला केलं जातं.
दुसरीकडे मात्र आज इकडे तर उद्या तिकडे जाणारे, सोयीप्रमाणे पक्ष बदलणारे आयाराम-गयाराम थेट वर पोहोचताना दिसतात. पक्षात येताच त्यांना मान, पद, प्रतिष्ठा आणि संरक्षण मिळतं. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये “आम्ही राबायचं आणि खुर्चीवर दुसराच बसायचा का?” असा थेट सवाल उपस्थित होत आहे.
या सगळ्या प्रकारामुळे गावपातळीवर नाराजी वाढत चालली आहे. अनेक ठिकाणी जुने कार्यकर्ते उघडपणे बोलू लागले आहेत. “आम्ही आयुष्य घालवलं पक्षासाठी, पण दोन दिवसात आलेले मोठे झाले,” अशी खंत ऐकायला मिळत आहे. काही ठिकाणी तर निषेध, आंदोलन आणि आत्मक्लेशाचे प्रकारही समोर येत आहेत.
राजकारण सेवा राहिली नाही, तर सत्तेचा धंदा बनत चाललं आहे, अशी चर्चा आता चहाच्या टपरीपासून चौकापर्यंत सुरू आहे. निष्ठेला जर किंमत नसेल, तर उद्या कोण पक्षासाठी जीव तोडून काम करणार, हा प्रश्नही उपस्थित होत आहे.
आज राजकारण एका वळणावर उभं आहे.
खुर्चीवर कोण बसणार…!
राबणारा की उडी मारणारा?
हा नवा अध्याय इथेच थांबणार, की आणखी गडद होणार?
याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.
- रस्त्यावरील झाडे अपघातांचे कारण;प्रशासनाचे दुर्लक्ष..!
- नामुचा “डल्ला” ठेकेदार-दारू विक्रेत्यांकडून “उत्साह” चा “फंड”..!
- भद्रावती आंबेडकरी राजकारणात संभ्रम; बी.एस.पी. व वंचित बहुजन आघाडीची भूमिका अस्पष्ट
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- विस वर्षांनंतर लोकमान्य विद्यालयाच्या वर्गमित्रांचा भावनिक पुनर्मिलन समारंभ
- जुन्या कार्यकर्त्यांना डावलून स्वयंघोषित नाम्यांच्या “डल्ला” प्रकरणावर नारीशक्तीने ठोस निषेध..
- भद्रावतीतील नाम्याचा राजकीय विस्फोट…! ज्येष्ठांचा विश्वासघात, अवैध व्यवसायांचा आधार, आणि पक्षांतर्गत वाढते वाद..! नाम्याचा “डल्ला” ..! स्वयंघोषित नेतृत्वाने भद्रावतीत वादांचा वाढता पाऊस…
- भद्रावती नगरपरिषद निवडणूक; प्रभाग ७ मध्ये इम्रान खान हे संभाव्य नगरसेवक म्हणून चर्चेत…!
- “त्या” पक्षातील पारदर्शकतेवर जुन्या निष्ठावंतांचा भडकता ऐल्गार..! नाम्या यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह..!


