Monday, October 26, 2026
Homeचंद्रपूरछगन भुजबळांच्या वाढदिवशी चिमुकल्यांना आनंदाची भेट; नांदा शाळेत बिस्किट वाटप

छगन भुजबळांच्या वाढदिवशी चिमुकल्यांना आनंदाची भेट; नांदा शाळेत बिस्किट वाटप

छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त नांदा शाळेत विद्यार्थ्यांना बिस्किट वाटप

महात्मा फुले समता परिषदेचा सामाजिक उपक्रम; विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलला आनंद

 

कोरपना, न्यूज डेस्क

शंकर बोरघरे , 95 52 61 25 55

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, नांदा (मराठी), ता. कोरपना, जि. चंद्रपूर येथे शालेय विद्यार्थ्यांना बिस्किट पाकिटांचे वाटप करण्यात आले.

समाजातील वंचित व गरजू घटकांपर्यंत पोहोचून सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांना बिस्किट पाकिटे वितरित करण्यात आल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली तुम्मे होत्या. यावेळी महात्मा फुले समता परिषदेच्या तालुकाध्यक्ष वैशाली पोटरंगे, सचिव मनीषा आदे, तालुका उपाध्यक्ष अनिता भेंढारे, उपाध्यक्ष मंजुळा आदे, संघटक कल्याणी कुळसंगे व संघटक कांचन निवदे उपस्थित होत्या.

तसेच शाळेतील शिक्षक भगवान नागरगोजे, गोविंदा गुप्ता, गुलाब राठोड, विनोद किन्नाके आणि संतोष कोटरंगे यांनीही उपस्थिती दर्शविली.

छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या उपक्रमातून विद्यार्थ्यांसोबत आनंदाचे क्षण साजरे करत सामाजिक कार्याचा संदेश देण्यात आला.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!