चंद्रपूर… गडचिरोलीपर्यंत यवतमाळ… वणी… आता छतीघाट…
५० रुपयांचा प्रेसकार्ड…
✍️ सहाय्यक संपादक :- प्रमोद दुबे
भाग ५ : छतीघाटाचा घुसलेला झोलाशाप थाप
आता वारी-वारी संपली,
यवतमाळ…वणीची नवी वारी सुरू झाली,
काल चारचाकीचा उर्मट थाट होता,
आज दुचाकीवरची धूळ अंगावर आली!कणी-कणी करत वारी फिरते,
रोज नवा रस्ता, रोज नवी गोष्ट,
छतीघाटाकडे वळण घेतं सगळं,
पण महाराष्ट्र तुटेना…
तो मात्र सगळं सहन करत बसतो!तो स्वतःला मालक सांगतो,
छाती फुगवून फिरतो भारी,
“दहा..पंधरा हजारांची मदत करतो,”
असं म्हणत उघडतो
छतीघाट हेल्पलाईनची दारी!काल दुचाकीवर फिरणारा,
आज मोठा साहेब झाल्यासारखा,
मदतीचा हिशोब विचारताच,
तोंड आणि खिसा..दोन्ही एकदम बंद झाल्यासारखा!
स्वयंपाकी आहे हात सफाईचा,
भाजी-भाकरी लई भारी,
पण बातमी लिहायला सांगितली,
तर अक्षरं पळतात सारी!एके दिवशी जेलवारी झाली,
तेव्हापासून छाती फुगलेली,
“मी बातम्यांचा माजकूर!” म्हणत फिरतो,
पण अक्कल मात्र
कुठेतरी डवरापानीला विसरलेली!डवरापानी शब्द निघताच,
तो लगेच विषय बदलतो,
“तो मी नव्हेच!” म्हणत म्हणत
नवी थाप तयार करतो!आता मध्येच वाजतो फोन,
गडद काळ्या रंगाचा,
पलीकडून आवाज गुरगुरतो..
“मैं कुछ भी कर सकता हूँ!”
“मैं तक्रार भी कर सकता हूँ!”पण पुरावा विचारताच लगेच
सिग्नल जातो,
आणि छतीघाट हेल्पलाईन
थेट होल्डवर टाकतो!काल म्हणे “मीच वारी केली,”
आज म्हणे “तो दुसराच गेला,”
पुरावा मागितला की उत्तर एकच
“नेट नाही!”
आणि विषय संपला!सेल्फी काढून स्टेटस टाकतो,
कॅप्शन “खळबळ उडाली!”
खळबळ नाही रे बाबा,
लोकांच्या पोटात
हसूच उडाली!गाडी बदलते, जिल्हा बदलतो,
वारी बदलते, कथा बदलते,
पण छतीघाटचं गणित तसंच राहातं..
धमकी + थापा = मोठेपणा,
आणि सत्य मात्र
कुठेच कनेक्ट होत नाही!पारावर आजोबा हसत म्हणाले,
मिशीला देत पीळ..
“ही माहितीची सेवा नाही रे,
हा छतीघाट नावाचा
फिरता गोंधळ आहे,
जिथे फोन लागतो,
पण जबाबदारी
कधीच लागत नाही!”शेवटचा टोचरा ठसा (नवीन जोड)
राज्याचे पस्तीस घाट पाणी पिऊन,
आता थेट निघाले क्षत्रीघाटाकडे,
तालुका कोणता, जिल्हा कोणता
याचा विचारच संपलेला!भाषा बदलते, वळण बदलतं,
पण वसुलीचं गणित मात्र अचूक,
अनुभव इतका जबरदस्त,
की यांना
“थापा, धमकी आणि फिरती वारी”
या विषयात
थेट PhD द्यावी!क्रमशः…
पुढचा भाग : भाग ६..
“छतीघाट हेल्पलाईन : कॉल कट… की कॉल वाढ?”
- रस्त्यावरील झाडे अपघातांचे कारण;प्रशासनाचे दुर्लक्ष..!
- नामुचा “डल्ला” ठेकेदार-दारू विक्रेत्यांकडून “उत्साह” चा “फंड”..!
- भद्रावती आंबेडकरी राजकारणात संभ्रम; बी.एस.पी. व वंचित बहुजन आघाडीची भूमिका अस्पष्ट
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- विस वर्षांनंतर लोकमान्य विद्यालयाच्या वर्गमित्रांचा भावनिक पुनर्मिलन समारंभ
- जुन्या कार्यकर्त्यांना डावलून स्वयंघोषित नाम्यांच्या “डल्ला” प्रकरणावर नारीशक्तीने ठोस निषेध..
- भद्रावतीतील नाम्याचा राजकीय विस्फोट…! ज्येष्ठांचा विश्वासघात, अवैध व्यवसायांचा आधार, आणि पक्षांतर्गत वाढते वाद..! नाम्याचा “डल्ला” ..! स्वयंघोषित नेतृत्वाने भद्रावतीत वादांचा वाढता पाऊस…
- भद्रावती नगरपरिषद निवडणूक; प्रभाग ७ मध्ये इम्रान खान हे संभाव्य नगरसेवक म्हणून चर्चेत…!
- “त्या” पक्षातील पारदर्शकतेवर जुन्या निष्ठावंतांचा भडकता ऐल्गार..! नाम्या यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह..!


