✍️सहाय्यक संपादक :- प्रमोद दुबे
५० रुपयांचा प्रेसकार्ड…
भाग ५ :-
तो भलताच यंत्रसंच घेतो म्हणे,
छाती फुगवून सांगतो,
नेमकं काय आहे ते विचारलं,
तर स्वतःलाच गोंधळ होतो!काल दुचाकीवर फिरणारा,
आज मोठा मालक झाल्यासारखा,
पण त्या यंत्रसंचाचं नाव घेताच
तोंडातून शब्दच निघेना सारखा!स्वयंपाकी आहे हात सफाईचा,
भाजी-भाकरी लई भारी,
पण बातमी लिहायला सांगितली,
तर अक्षरं पळतात सारी!एके दिवशी जेलवारी झाली,
तेव्हापासून छाती फुगलेली,
“मी पत्रकार!” म्हणत फिरतो,
पण अक्कल मात्र
कुठेतरी डवरापानीला विसरलेली!डवरापानी शब्द निघताच,
तो लगेच विषय बदलतो,
“तो मी नव्हेच!” म्हणत म्हणत
नवी गोष्ट तयार करतो!काल म्हणे “मीच यवतमाळ वारी केली,”
आज म्हणे “तो दुसराच गेला,”
पुरावा विचारताच लगेच
“नेट नाही!” हा सूर लागला!सेल्फी काढून स्टेटस टाकतो,
कॅप्शन “खळबळ उडाली!”
खळबळ नाही रे बाबा,
लोकांच्या पोटात हसूच उडाली!तो भलताच यंत्रसंच,
भलताच दावा, भलताच बोल,
गाडी बदलते, जिल्हा बदलतो,
पण झोलपणा मात्र कायम गोल!पारावर आजोबा हसत म्हणाले,
मिशीला देत पीळ
“स्वयंपाकी, जेलवारी,डवरापानी,
आणि हा भलताच यंत्रसंच…
हा पत्रकार नाही रे,
हा तर फिरता गोंधळ-संच!”
शेवटचा हास्यठसा
यंत्रसंच कोणता,
काम कुठलं,
पुरावा काहीच नाही,
पण पकड येताच आठवतं
‘तो मी नव्हेच!’
हेच याचं खरं गाणं भाई!क्रमशः…
पुढचा भाग :-
“यंत्रसंच आहे… पण चालवणारा कोण?”
- रस्त्यावरील झाडे अपघातांचे कारण;प्रशासनाचे दुर्लक्ष..!
- नामुचा “डल्ला” ठेकेदार-दारू विक्रेत्यांकडून “उत्साह” चा “फंड”..!
- भद्रावती आंबेडकरी राजकारणात संभ्रम; बी.एस.पी. व वंचित बहुजन आघाडीची भूमिका अस्पष्ट
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- विस वर्षांनंतर लोकमान्य विद्यालयाच्या वर्गमित्रांचा भावनिक पुनर्मिलन समारंभ
- जुन्या कार्यकर्त्यांना डावलून स्वयंघोषित नाम्यांच्या “डल्ला” प्रकरणावर नारीशक्तीने ठोस निषेध..
- भद्रावतीतील नाम्याचा राजकीय विस्फोट…! ज्येष्ठांचा विश्वासघात, अवैध व्यवसायांचा आधार, आणि पक्षांतर्गत वाढते वाद..! नाम्याचा “डल्ला” ..! स्वयंघोषित नेतृत्वाने भद्रावतीत वादांचा वाढता पाऊस…
- भद्रावती नगरपरिषद निवडणूक; प्रभाग ७ मध्ये इम्रान खान हे संभाव्य नगरसेवक म्हणून चर्चेत…!
- “त्या” पक्षातील पारदर्शकतेवर जुन्या निष्ठावंतांचा भडकता ऐल्गार..! नाम्या यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह..!


