Friday, April 17, 2026
Homeभद्रावतीविनापरवाना देशी-विदेशी दारूचा सुळसुळाट;

विनापरवाना देशी-विदेशी दारूचा सुळसुळाट;

प्रसारमाध्यमातून जनसेवक इम्रान खान यांची थेट मागणी

भद्रावती:-

घोडपेठ गावात सध्या एक वेगळीच “सुविधा योजना” सुरू असल्याची चर्चा आहे.
शाळा, ग्रामपंचायत, सामाजिक सोहळ्यांची ठिकाणे, मागे किसान भवन आणि थेट नागपूर..चंद्रपूर मुख्य मार्गालगत बसस्थानक…
आणि या सगळ्यांच्या आसपास विनापरवाना देशी-विदेशी दारूची विक्री खुलेआम सुरू असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.
यामुळे घोडपेठ ग्रामस्थ वैतागले असून, गावात हसत-हसत संताप व्यक्त केला जात आहे.
या प्रकारावर इम्रान खान (जनसेवक) यांनी प्रसारमाध्यमातून थेट मागणी करत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
ते म्हणाले,
“शाळा, ग्रामपंचायत आणि सामाजिक सोहळ्यांच्या ठिकाणांजवळ दारू विक्री होणे गंभीर बाब आहे.
अशा ठिकाणी शांतता, सुरक्षितता आणि सामाजिक शिस्त राखली गेली पाहिजे.”
नागपूर..चंद्रपूर हा वर्दळीचा मार्ग असल्याने बसस्थानक परिसरात दिवसभर प्रवाशांची ये-जा असते.
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार,
“बस थांब्यावर प्रवाशांसाठी पाणी-सावली हवी होती,
पण इथे दारू सहज मिळते ही बाब चिंताजनक आहे.”
इम्रान खान यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की,
विनापरवाना दारू इतक्या सहज उपलब्ध होत असेल,
तर संबंधित यंत्रणांनी याकडे गांभीर्याने पाहून तातडीची कारवाई करणे आवश्यक आहे.”
यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमातून मागणी केली की..
शाळा, ग्रामपंचायत, सामाजिक सोहळ्यांची ठिकाणे, किसान भवन आणि बसस्थानक परिसरातील विनापरवाना देशी-विदेशी दारू विक्री तात्काळ बंद करावी.
संबंधित विभागांनी धडक व ठोस कारवाई करावी.
नियमित तपासणी व गस्त वाढवून सार्वजनिक ठिकाणांची सुरक्षितता सुनिश्चित करावी.
सध्या घोडपेठमध्ये एकच चर्चा सुरू आहे
“सार्वजनिक ठिकाणी शिस्त कधी प्रस्थापित होणार?”
आता प्रसारमाध्यमातून मांडलेल्या या मागणीनंतर प्रशासन कोणती पावले उचलते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!