Monday, September 14, 2026
Homeभद्रावतीगल्लीबोळांत उडणारा गांजाचा धूर थांबवा; प्रशासनाकडे आर्त हाक..! जनसेवक इम्रान खान...

गल्लीबोळांत उडणारा गांजाचा धूर थांबवा; प्रशासनाकडे आर्त हाक..! जनसेवक इम्रान खान…

जनसेवक इम्रान खान…यांची मागणी 

भद्रावती :-शहरातील काही भागांत गांजाच्या अवैध सेवनामुळे उडणाऱ्या धुराने परिसर दाटून जात असून, यामुळे स्थानिक नागरिक तीव्र त्रस्त झाले आहेत. गल्लीबोळ, मोकळ्या जागा आणि काही छुप्या ठिकाणी रात्रीसह दिवसा देखील अशी हालचाल सुरू असल्याची तक्रार नागरिकांनी केली असून, या प्रकाराने परिसरातील शांतता आणि आरोग्य या दोन्हीवर धोका निर्माण झाला आहे.
या वाढत्या समस्येकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव इम्रान खान यांनी प्रसारमाध्यमांद्वारे केली आहे. नागरिकांकडून आलेल्या वारंवार तक्रारींच्या आधारे त्यांनी या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली.

इम्रान खान म्हणाले की, शहरातील काही भागांत रात्री उशिरापर्यंत तरुणांची गर्दी होत असून, संशयास्पद हालचाल, गांजाचा वास आणि धूर यामुळे आसपास राहणाऱ्या कुटुंबांना अस्वस्थता जाणवते. धुराचा त्रास लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनाच्या तक्रारी असलेल्या रुग्णांना विशेषतः जाणवत आहे. परिसरातील वातावरण दूषित होत असल्याने भद्रावती शहराची शांतता व नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे, असा आरोप त्यांनी केला.
इम्रान खान यांनी स्पष्ट केले की, भाजयुमोचा उद्देश कोणत्याही प्रकारे कायदा हातात घेण्याचा नसून, संपूर्ण कारवाई कायद्याच्या चौकटीत राहूनच व्हावी, अशी त्यांची ठाम भूमिका आहे. त्यांनी पोलिस आणि स्थानिक प्रशासनाने खालील उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी मागणी केली..!
गांजाच्या सेवनाचे सत्र सुरू असलेल्या गल्लीबोळ, मोकळ्या जागा आणि संशयास्पद ठिकाणी नियमित गस्त वाढवणे..!
गुप्त माहितीच्या आधारे तपास..! आणि छापेमाऱ्या करून अवैध व्यवहारांना आळा घालणे..!
दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करून समाजाला आदर्श उदाहरण देणे…!
इम्रान खान यांनी सांगितले की, गांजाचे व्यसन हे केवळ व्यक्तिगत पातळीवरील नाही, तर समाजघातक रूप धारण करू लागलेले गंभीर व्यसन आहे. एकीकडे शाळा महाविद्यालयांच्या परिसरात नशेविरोधी जनजागृती केली जात असताना दुसरीकडे अशा बेकायदेशीर हालचाली वाढत असल्यास तरुण पिढी भलत्याच मार्गाला जाण्याचा धोका निर्माण होतो, असेही त्यांनी नमूद केले.
प्रशासनाने या प्रकरणी त्वरित, जबाबदारीने आणि पारदर्शकपणे कारवाई केल्यास नागरिकांच्या मनातील भीती व संताप कमी होईल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. तसेच, गांजाच्या धुरामुळे त्रस्त झालेल्या परिसरांची ओळख पटवून, त्या ठिकाणी विशेष मोहीम राबवण्याचीही त्यांनी सूचना केली.
जनसेवक इम्रान खान यांनी नागरिकांनाही जबाबदारीची जाणीव करून दिली. त्यांनी आवाहन केले की,
कुठेही गांजाचे सेवन, विक्री किंवा संशयास्पद हालचाल दिसल्यास..
त्याची माहिती तत्काळ पोलिस किंवा संबंधित यंत्रणांना द्यावी
सोशल मीडियावर अफवा पसरवण्याऐवजी थेट अधिकृत तक्रार नोंदवावी..!
त्यांच्या मते,नागरिक, युवा संघटना आणि प्रशासन यांचे समन्वयाने प्रयत्न झाल्यास भद्रावती शहर गांजाविरोधी प्रभावी मोहिम उभी करू शकते. शहराचे आरोग्यदायी आणि सुरक्षित वातावरण टिकवण्यासाठी सर्व घटकांनी एकत्र येणे काळाची गरज असल्याचे ते म्हणाले.
भद्रावतीतील वाढत्या नागरीकरणासोबत नशेचे प्रमाणही हळूहळू वाढत असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे.
यापूर्वीही विविध सामाजिक संघटनांनी गांजाविरोधी आणि नशाविरोधी जनजागृती करण्याची मागणी केली होती. आता भाजयुमो प्रदेश सचिव जनसेवक इम्रान खान यांनी उचललेला हा मुद्दा लक्षात घेऊन प्रशासन कोणती ठोस पावले उचलते, याकडे भद्रावतीकरांचे लक्ष लागले आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!