मूल:-जुबेद शेख, तालुका प्रतिनिधी✍️
मूल तालुक्यातील भेजगाव येथे राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमांतर्गत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भव्य निशुल्क मोतीबिंदू नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर मंगळवार, दिनांक १३ जानेवारी रोजी ग्रामपंचायत आवारात पार पडले.
या उपक्रमाचे आयोजन समता फाउंडेशन, शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आणि सक्षम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत नागरिकांची सखोल नेत्र तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरणाऱ्या रुग्णांवर नागपूर येथील शालिनीताई मेघे हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
या शिबिराचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे रुग्णांची नेत्र तपासणी, नागपूर येथे ने-आण, शस्त्रक्रिया तसेच उपचारादरम्यान राहण्याची संपूर्ण व्यवस्था पूर्णतः मोफत ठेवण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आणि सुलभ नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सक्षम फाउंडेशनने या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. या शिबिराचा जास्तीत जास्त गरजू नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कार्यक्रमाच्या संयोजिका विशाखा शशिकांत गणवीर यांनी केले आहे.
या उपक्रमामुळे अनेक गरजू रुग्णांच्या आयुष्यात पुन्हा उजेड येण्याची आशा निर्माण झाली असून ग्रामस्थांनी आयोजकांचे मनापासून आभार मानले आहेत.
- रस्त्यावरील झाडे अपघातांचे कारण;प्रशासनाचे दुर्लक्ष..!
- नामुचा “डल्ला” ठेकेदार-दारू विक्रेत्यांकडून “उत्साह” चा “फंड”..!
- भद्रावती आंबेडकरी राजकारणात संभ्रम; बी.एस.पी. व वंचित बहुजन आघाडीची भूमिका अस्पष्ट
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- विस वर्षांनंतर लोकमान्य विद्यालयाच्या वर्गमित्रांचा भावनिक पुनर्मिलन समारंभ
- जुन्या कार्यकर्त्यांना डावलून स्वयंघोषित नाम्यांच्या “डल्ला” प्रकरणावर नारीशक्तीने ठोस निषेध..
- भद्रावतीतील नाम्याचा राजकीय विस्फोट…! ज्येष्ठांचा विश्वासघात, अवैध व्यवसायांचा आधार, आणि पक्षांतर्गत वाढते वाद..! नाम्याचा “डल्ला” ..! स्वयंघोषित नेतृत्वाने भद्रावतीत वादांचा वाढता पाऊस…
- भद्रावती नगरपरिषद निवडणूक; प्रभाग ७ मध्ये इम्रान खान हे संभाव्य नगरसेवक म्हणून चर्चेत…!
- “त्या” पक्षातील पारदर्शकतेवर जुन्या निष्ठावंतांचा भडकता ऐल्गार..! नाम्या यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह..!


