भद्रावती:-प्रतिनिधी
नागरिकांचा हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल पुन्हा मिळू शकतो, याचा दिलासादायक अनुभव भद्रावतीतील नागरिकांना आला आहे. भद्रावती पोलीस स्टेशन यांच्या विशेष मोहिमेत एकूण ०५ हरविलेले मोबाईल फोन शोधून काढत ते मूळ तक्रारदारांच्या स्वाधीन करण्यात आले. या मोबाईलची अंदाजित किंमत सुमारे ७० हजार रुपये आहे.
पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी व सहायक पोलीस निरीक्षक वीरेंद्र केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली नापोअं भारत पुसांडे यांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केली. नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींचा सातत्याने पाठपुरावा करत विविध ठिकाणांहून मोबाईल हस्तगत करण्यात आले, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे.
तसेच १२ जानेवारी२०२६ रोजी आयोजित कार्यक्रमात हस्तगत केलेले सर्व मोबाईल त्यांच्या मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आले. मोबाईल परत मिळाल्याने तक्रारदार नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान दिसून आले. यावेळी पोलिसांनी मोबाईलची योग्य काळजी घेण्याचे तसेच मोबाईल हरविल्यास किंवा चोरीला गेल्यास त्वरित पोलिसांकडे तक्रार नोंदवण्याचे आवाहन केले.
याशिवाय नागरिकांच्या समस्यांकडे गांभीर्याने पाहत, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून केलेली ही सकारात्मक कारवाई पोलिस, नागरिक नातेसंबंध अधिक दृढ करणारी ठरत असून, भद्रावती पोलिसांच्या या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
- रस्त्यावरील झाडे अपघातांचे कारण;प्रशासनाचे दुर्लक्ष..!
- नामुचा “डल्ला” ठेकेदार-दारू विक्रेत्यांकडून “उत्साह” चा “फंड”..!
- भद्रावती आंबेडकरी राजकारणात संभ्रम; बी.एस.पी. व वंचित बहुजन आघाडीची भूमिका अस्पष्ट
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- विस वर्षांनंतर लोकमान्य विद्यालयाच्या वर्गमित्रांचा भावनिक पुनर्मिलन समारंभ
- जुन्या कार्यकर्त्यांना डावलून स्वयंघोषित नाम्यांच्या “डल्ला” प्रकरणावर नारीशक्तीने ठोस निषेध..
- भद्रावतीतील नाम्याचा राजकीय विस्फोट…! ज्येष्ठांचा विश्वासघात, अवैध व्यवसायांचा आधार, आणि पक्षांतर्गत वाढते वाद..! नाम्याचा “डल्ला” ..! स्वयंघोषित नेतृत्वाने भद्रावतीत वादांचा वाढता पाऊस…
- भद्रावती नगरपरिषद निवडणूक; प्रभाग ७ मध्ये इम्रान खान हे संभाव्य नगरसेवक म्हणून चर्चेत…!
- “त्या” पक्षातील पारदर्शकतेवर जुन्या निष्ठावंतांचा भडकता ऐल्गार..! नाम्या यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह..!


