चंद्रपूर:- चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका २०२५-२६ अंतर्गत महाकाली मंदिर प्रभाग क्रमांक १२ मध्ये एकत्रित पॅनलच्या माध्यमातून लढणाऱ्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली असून, मतदारांमध्ये या पॅनलबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. विविध सामाजिक घटकांचे प्रतिनिधित्व करणारे उमेदवार एकत्र आल्याने प्रभागात विकासाभिमुख आणि स्थिर नेतृत्वाचा पर्याय म्हणून या पॅनलकडे पाहिले जात आहे.
या संयुक्त पॅनलमध्ये एकता दिनकर गुगले (अनुसूचित जाती महिला , गट-अ, चिन्ह: स्कूटर), सौ. अरुणा अजय वैरागडे (ना.मा.प्र. ओबीसी महिला , गट-ब, चिन्ह: ऑटो रिक्षा), जाकीर ईदन शेख (सर्वसाधारण, गट-क, चिन्ह: पतंग) आणि नंदू संभाजी नागरेकर (सर्वसाधारण , गट-ड, चिन्ह: रोड रोलर) हे उमेदवार एकत्रितपणे निवडणूक लढवत आहेत.
चारही उमेदवारांचा अनुभव, सामाजिक संपर्क आणि संघटित प्रचार यामुळे पॅनलला मोठे बळ मिळाले आहे.प्रभागातील नागरिकांशी थेट संवाद, घरोघरी भेटी, बैठका आणि संयुक्त प्रचार फेऱ्यांमुळे या पॅनलबाबत विश्वासाचे वातावरण तयार झाले आहे. महिलांचे सशक्तीकरण, मूलभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि परिसराचा सर्वांगीण विकास या मुद्द्यांवर पॅनलने एकसंध भूमिका मांडली आहे. विशेष म्हणजे सर्व गटांचे प्रतिनिधित्व एकाच पॅनलमध्ये असल्याने मतदारांकडून याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.
स्थानिक नागरिकांमध्ये “प्रभागाचा समतोल विकास करणारे नेतृत्व” म्हणून या पॅनलकडे पाहिले जात असून, विजयाची खात्रीशीर वाटचाल सुरू असल्याची चर्चा प्रभागात ऐकू येत आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यातही या पॅनलचा उत्साह आणि संघटनशक्ती कायम असल्याचे दिसून येत आहे.
मतदान गुरुवार, १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत होणार असून, मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करून विकासाला साथ द्यावी, असे आवाहन पॅनलकडून करण्यात येत आहे.
- रस्त्यावरील झाडे अपघातांचे कारण;प्रशासनाचे दुर्लक्ष..!
- नामुचा “डल्ला” ठेकेदार-दारू विक्रेत्यांकडून “उत्साह” चा “फंड”..!
- भद्रावती आंबेडकरी राजकारणात संभ्रम; बी.एस.पी. व वंचित बहुजन आघाडीची भूमिका अस्पष्ट
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- विस वर्षांनंतर लोकमान्य विद्यालयाच्या वर्गमित्रांचा भावनिक पुनर्मिलन समारंभ
- जुन्या कार्यकर्त्यांना डावलून स्वयंघोषित नाम्यांच्या “डल्ला” प्रकरणावर नारीशक्तीने ठोस निषेध..
- भद्रावतीतील नाम्याचा राजकीय विस्फोट…! ज्येष्ठांचा विश्वासघात, अवैध व्यवसायांचा आधार, आणि पक्षांतर्गत वाढते वाद..! नाम्याचा “डल्ला” ..! स्वयंघोषित नेतृत्वाने भद्रावतीत वादांचा वाढता पाऊस…
- भद्रावती नगरपरिषद निवडणूक; प्रभाग ७ मध्ये इम्रान खान हे संभाव्य नगरसेवक म्हणून चर्चेत…!
- “त्या” पक्षातील पारदर्शकतेवर जुन्या निष्ठावंतांचा भडकता ऐल्गार..! नाम्या यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह..!


