नागपूर, चंद्रपूर हद्दीत KPCL कंपनी च्या जागेवर धनदांडग्यांचा डल्ला; बेरोजगारांच्या तोंडचा घास हिरावल्याचा आरोप..!
चंद्रपूर, न्यूज डेस्क ✍️
नागपूर, चंद्रपूर हद्दीला लागून असलेल्या भद्रावती तालुक्यात KPCL कंपनीच्या ६१ व ६२ क्रमांकाच्या जागेवर तारांकित (३-स्टार) सुविधांसह आलिशान हॉटेल उभारण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. सार्वजनिक संस्थेच्या जमिनीवर थेट अतिक्रमण करून धनदांडग्यांनी आपले साम्राज्य उभे केले असून, प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचा संतापजनक आरोप होत आहे.
या दरम्यान भाजयुमोचे प्रदेश सचिव तथा जनसेवक इम्रान खान यांनी या प्रकरणात थेट बोट ठेवत स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे.
“ज्यांच्याकडे आधीच कोट्यवधींची संपत्ती आहे, अशा हॉटेल मालकांसाठी सरकारी व सार्वजनिक जमीन खुली आणि नागपूर, चंद्रपूर परिसरातील सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी मात्र काहीच नाही, ही सरळसरळ लूट आहे,” असा घणाघाती हल्ला त्यांनी केला.
इतकेच नव्हे तर संबंधित तारांकित हॉटेल मालकाकडून अवैध उत्खनन सुरू असल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे. पर्यावरणाची होरपळ होत असताना आणि नियम पायदळी तुडवले जात असताना, संबंधित यंत्रणा डोळेझाक का करत आहेत? असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे.
तसेच KPCL च्या जागेवरील अतिक्रमण तत्काळ हटवून ती जमीन स्थानिक बेरोजगार युवकांसाठी रोजगारनिर्मितीच्या प्रकल्पांना देण्यात यावी, अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
प्रशासन धनाढ्यांच्या बाजूने उभे राहणार की बेरोजगार युवकांच्या हक्कांसाठी कारवाई करणार, याकडे संपूर्ण नागपूर,चंद्रपूर परिसराचे लक्ष लागले आहे.
- रस्त्यावरील झाडे अपघातांचे कारण;प्रशासनाचे दुर्लक्ष..!
- नामुचा “डल्ला” ठेकेदार-दारू विक्रेत्यांकडून “उत्साह” चा “फंड”..!
- भद्रावती आंबेडकरी राजकारणात संभ्रम; बी.एस.पी. व वंचित बहुजन आघाडीची भूमिका अस्पष्ट
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- विस वर्षांनंतर लोकमान्य विद्यालयाच्या वर्गमित्रांचा भावनिक पुनर्मिलन समारंभ
- जुन्या कार्यकर्त्यांना डावलून स्वयंघोषित नाम्यांच्या “डल्ला” प्रकरणावर नारीशक्तीने ठोस निषेध..
- भद्रावतीतील नाम्याचा राजकीय विस्फोट…! ज्येष्ठांचा विश्वासघात, अवैध व्यवसायांचा आधार, आणि पक्षांतर्गत वाढते वाद..! नाम्याचा “डल्ला” ..! स्वयंघोषित नेतृत्वाने भद्रावतीत वादांचा वाढता पाऊस…
- भद्रावती नगरपरिषद निवडणूक; प्रभाग ७ मध्ये इम्रान खान हे संभाव्य नगरसेवक म्हणून चर्चेत…!
- “त्या” पक्षातील पारदर्शकतेवर जुन्या निष्ठावंतांचा भडकता ऐल्गार..! नाम्या यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह..!


