Friday, April 17, 2026
Homeचंद्रपूरमूल येथे राज्य पत्रकार संघाची आढावा बैठक संपन्न

मूल येथे राज्य पत्रकार संघाची आढावा बैठक संपन्न

मूल येथे राज्य पत्रकार संघाची आढावा बैठक संपन्न..!

मूल (चंद्रपूर): महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईच्या चंद्रपूर जिल्हा अंतर्गत मूल तालुका शाखेच्या वतीने मूल येथे पत्रकार संघाच्या पुढील कामकाजाचा आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली. या बैठकीस महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. महेश पानसे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या बैठकीचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष शंकर बोरघरे व सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष राहुल थोरात यांनी केले. यावेळी प्रा. पानसे यांनी पत्रकारितेचे सामाजिक दायित्व, पत्रकारांचे हक्क व बदलत्या माध्यमविश्वातील आव्हाने यावर मार्गदर्शन केले.
याशिवाय राजुरा तालुका अध्यक्ष डोंगे सर यांनी संघटनात्मक एकोपा व जबाबदारीने काम करण्यावर भर दिला.
या प्रसंगी बैठकीस मूल तालुका अध्यक्ष सतिश राजुरवार यांच्यासह तालुका शाखेतील सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. तसेच सिंदेवाही तालुका अध्यक्ष वहाब अली सय्यद, सचिव सचिन रामटेके व अरविंद सिडाम उपस्थित होते.
यावेळी राजूरा तालुका पदाधिकारी कार्याध्यक्ष ओंकार आस्वले, उपाध्यक्ष सतीश शिंदे व विजय जुलमे, सचिव संतोष मेश्राम, सहसचिव लोकेश पारखी, कोषाध्यक्ष अंकुश भोंगळे, संघटक राकेश कलेगुरवार, प्रसिद्धी प्रमुख अनिल गांपावार तसेच सदस्य अनिलकुमार गिरमील्ला, कैलास कार्लेकर, गौरव कोडापे, सागर मुत्यालवार व संतोष देरकर उपस्थित होते.
या बैठकीत पत्रकारांच्या समस्या, संघटन विस्तार, सदस्य नोंदणी व भविष्यातील उपक्रमांवर चर्चा करण्यात आली. बैठकीमुळे पत्रकार संघाच्या पुढील कामकाजास दिशा मिळाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!