Friday, April 17, 2026
Homeभद्रावतीकोंढा बसस्थानक दारू अड्डा बनलां; कारवाई कुठे अडली? भाजयुमो प्रदेश सचिव तथा...

कोंढा बसस्थानक दारू अड्डा बनलां; कारवाई कुठे अडली? भाजयुमो प्रदेश सचिव तथा जनसेवक इम्रान खान..!

चंद्रपूर, भद्रावती न्यूज डेस्क ✍️

भद्रावती तालुक्यातील कोंढा गावातील बसस्थानक परिसरात बेकायदा देशी-विदेशी दारूची खुलेआम विक्री व सेवन सुरूच असून, प्रसारमाध्यमांतून मुद्दा उघड होऊनही प्रशासनाकडून अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
हे बसस्थानक शालेय विद्यार्थी, प्रवासी व जड वाहनचालकांचे प्रमुख थांबे असताना चहा-नाश्त्याच्या दुकानांच्या आडून दारू विकली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

या प्रसंगी दारूचा वास, गैरवर्तन आणि अनुचित प्रकारांमुळे विद्यार्थ्यांवर वाईट परिणाम होत असून, काही वाहनचालक दारू सेवन करून वाहन चालवत असल्याने रस्ते सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
नागरिकांच्या मागणीनंतर भाजयुमो प्रदेश सचिव जनसेवक इम्रान खान यांनी प्रसारमाध्यमांतून प्रशासनाचे लक्ष वेधले, तरीही कारवाई शून्य असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला जात आहे.

प्रसंगी तात्काळ कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!