Saturday, September 12, 2026
Homeभद्रावतीद्रोणाचार्य क्रीडा मंडळाचा डबल धमाका..!

द्रोणाचार्य क्रीडा मंडळाचा डबल धमाका..!

भद्रावतीचा खो, खो..
देशपातळीवर!

द्रोणाचार्य क्रीडा मंडळाचा डबल धमाका..!

भद्रावती:- प्रतिनिधी

भद्रावतीच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाचा क्षण ठरला असून, द्रोणाचार्य क्रीडा व सांस्कृतिक मंडळाने खो-खो खेळात दुहेरी यश मिळवून शहराचा मान देशपातळीवर उंचावला आहे. मंडळाचे प्रशिक्षक संतोष निंबाळकर यांची ३५ व्या सब-ज्युनिअर राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी (मुले व मुली) तांत्रिक अधिकारी म्हणून निवड झाली आहे. ही राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा ३१ जानेवारी ते ४ फेब्रुवारी २०२६ दरम्यान हरियाणातील कुरुक्षेत्र येथे होणार आहे.

याचवेळी द्रोणाचार्य क्रीडा मंडळाचाच खेळाडू अमर आंबुलवार याची विदर्भाच्या मुलांच्या खो-खो किशोर गट संघात निवड झाल्याने मंडळासाठी हा दुहेरी आनंदाचा क्षण ठरला आहे. एकाच मंडळातून प्रशिक्षक राष्ट्रीय स्पर्धेत तांत्रिक जबाबदारी सांभाळणार असून, त्याच मंडळाचा खेळाडू विदर्भ संघातून मैदानात उतरणार आहे.

याशिवायही निंबाळकर हे गेल्या अनेक वर्षांपासून खो-खो खेळाच्या प्रसार व विकासासाठी सातत्याने कार्यरत आहेत. शिस्तबद्ध प्रशिक्षण, नियमांचे सखोल ज्ञान आणि खेळाडू घडवण्याची त्यांची कार्यपद्धत सर्वत्र कौतुकास्पद ठरली आहे. त्यांच्या या निवडीमुळे भद्रावतीसह चंद्रपूर जिल्ह्याला राष्ट्रीय क्रीडा पातळीवर ओळख मिळाली आहे.

दरम्यान, अमर आंबुलवार याची विदर्भ संघात झालेली निवड ही त्याच्या मेहनतीचे, सातत्यपूर्ण सरावाचे आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाचे फलित आहे. ग्रामीण व निमशहरी भागातूनही गुणवत्तावान खेळाडू राज्य व राष्ट्रीय स्तरावर पोहोचू शकतात, हे या निवडीने सिद्ध झाले आहे.

या दुहेरी यशाबद्दल भद्रावतीचे नगराध्यक्ष प्रफुल भाऊ चटकी, चंद्रपूर जिल्हा खो-खो असोसिएशनचे सचिव अशोकजी मोरे, विवेकानंद महाविद्यालय भद्रावतीचे अध्यक्ष स्वान सर, सचिव अमन टेमुर्डे, प्राचार्य उमाटे सर, प्रा. संगीता बांबोडे यांनी अभिनंदन केले. तसेच द्रोणाचार्य क्रीडा मंडळातील ज्येष्ठ खेळाडू व पदाधिकारी ललित बदखल, राजू आसुटकर, दिनेश वंजारी, विनोद कावटी, दीपक ठाकरे, मंगेश लांडगे, युवराज भारती, दीपक कावटे, आशिष आसुटकर, प्रतिक देवतळे, सौ. सुचिता ढेंगळे, सौ. योगिणी शिंदे, सौ. माधुरी अवघडे यांच्यासह छत्रपती क्रीडा मंडळ भद्रावतीचे शंकर बोरघरे आणि मित्रपरिवाराने शुभेच्छा दिल्या.

तसेच द्रोणाचार्य क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या या यशामुळे भद्रावतीचा क्रीडा नकाशावर ठसा अधिक ठळक झाला असून, येत्या काळात आणखी खेळाडू राज्य व राष्ट्रीय स्तरावर पोहोचतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!