भद्रावतीत रेशन घोटाळा उघड; थकीत धान्य द्या, अन्यथा आंदोलन..!
थम घेऊनही रेशन गायब; रेशन दुकानधारकाविरुद्ध फौजदारी कारवाईची मागणी..!
भद्रावती, (प्रतिनिधी),
न्यूज डेस्क✍️
तालुक्यातील विविध भागांतील रेशन धारकांकडून थम (बायोमेट्रिक) घेण्यात येऊनही प्रत्यक्षात रेशन धान्य न मिळाल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत.
काही ठिकाणी महिन्यानमहिने थम घेऊन धान्य न देता लाभार्थ्यांना वंचित ठेवले जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
तसेच रेशन दुकानांवर लाभार्थ्यांचे नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारीसह इतर महिन्यांचे थम घेतले जातात; मात्र तांदूळ व गहू वितरित केले जात नाहीत, असा आरोप रेशन धारकांकडून होत आहे. या प्रकारामुळे गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांवर उपासमारीची वेळ येत असून शासनाच्या अन्नसुरक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या संदर्भात इम्रान खान (भाजयुमो प्रदेश सचिव तथा जनसेवक) यांनी तहसीलदार भद्रावती यांच्यामार्फत पुरवठा विभागाकडे निवेदन सादर केले आहे. सदर प्रकार हा केवळ निष्काळजीपणा नसून जाणीवपूर्वक फसवणूक, अपहार व शासनाच्या अन्नसुरक्षा योजनेचा गैरवापर असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, हा प्रकार राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा २०१३ चा सरळ भंग असून संबंधित दोषी रेशन दुकानधारकांवर दखलपात्र फौजदारी गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी. तसेच सर्व रेशन धारकांना त्यांचे थकीत धान्य तात्काळ देण्यात यावे, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, प्रशासनाने याबाबत तात्काळ आणि ठोस कारवाई न केल्यास भाजयुमोच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
या प्रकारामुळे भद्रावती तालुक्यातील संपूर्ण रेशन व्यवस्थेची विश्वासार्हता धोक्यात आली असून प्रशासन पुढे काय भूमिका घेते, याकडे सर्व रेशन धारकांचे लक्ष लागले आहे.
- रस्त्यावरील झाडे अपघातांचे कारण;प्रशासनाचे दुर्लक्ष..!
- नामुचा “डल्ला” ठेकेदार-दारू विक्रेत्यांकडून “उत्साह” चा “फंड”..!
- भद्रावती आंबेडकरी राजकारणात संभ्रम; बी.एस.पी. व वंचित बहुजन आघाडीची भूमिका अस्पष्ट
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- विस वर्षांनंतर लोकमान्य विद्यालयाच्या वर्गमित्रांचा भावनिक पुनर्मिलन समारंभ
- जुन्या कार्यकर्त्यांना डावलून स्वयंघोषित नाम्यांच्या “डल्ला” प्रकरणावर नारीशक्तीने ठोस निषेध..
- भद्रावतीतील नाम्याचा राजकीय विस्फोट…! ज्येष्ठांचा विश्वासघात, अवैध व्यवसायांचा आधार, आणि पक्षांतर्गत वाढते वाद..! नाम्याचा “डल्ला” ..! स्वयंघोषित नेतृत्वाने भद्रावतीत वादांचा वाढता पाऊस…
- भद्रावती नगरपरिषद निवडणूक; प्रभाग ७ मध्ये इम्रान खान हे संभाव्य नगरसेवक म्हणून चर्चेत…!
- “त्या” पक्षातील पारदर्शकतेवर जुन्या निष्ठावंतांचा भडकता ऐल्गार..! नाम्या यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह..!


