Saturday, June 6, 2026
Homeभद्रावतीभद्रावती टप्पा चौकातील सर्विस रोडवर मालवाहू वाहनांची रांग

भद्रावती टप्पा चौकातील सर्विस रोडवर मालवाहू वाहनांची रांग

भद्रावती टप्पा चौकातील सर्विस रोडवर मालवाहू वाहनांची रांग

वाहतुकीचा खोळंबा; दुचाकीस्वार व नागरिकांना मोठा धोका

भद्रावती (प्रतिनिधी) :चंद्रपूर, न्यूज डेस्क ✍️

भद्रावती शहरातील टप्पा चौक परिसरातील सर्विस रोडवर सध्या मालवाहू वाहनांची रांग लागत असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. मुख्य रस्त्यावरील वाहतूक टाळण्यासाठी तसेच मालवाहतुकीसाठी या सर्विस रोडचा मोठ्या प्रमाणात वापर होत असून, त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.

प्रत्यक्ष पाहणीदरम्यान ट्रक, पिकअप आणि इतर मालवाहू वाहने रांगेत उभी असल्याचे दिसून आले. काही ठिकाणी वाहनांची पार्किंग रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी असल्याने मार्ग अत्यंत अरुंद झाला आहे. परिणामी दुचाकीस्वारांना कडेला जाऊन मार्ग काढावा लागत असून समोरून अचानक वाहन आल्यास अपघाताची शक्यता वाढली आहे.

सर्विस रोडचा मूळ उद्देश काय?

सर्विस रोड (सेवा मार्ग) हा मुख्य रस्त्यावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि स्थानिक ये-जा सुलभ करण्यासाठी तयार केला जातो. मोठ्या वाहनांना मुख्य मार्गावर ठेवून लहान वाहनांना पर्यायी सुरक्षित मार्ग देणे हा त्यामागील उद्देश असतो. मात्र टप्पा चौक परिसरात या उद्देशाला हरताळ फासला जात असल्याचे दिसत आहे.

धोका नेमका कुठे?

वळणदार भागामुळे दृश्य मर्यादित

अनियमित पार्किंगमुळे रस्ता अरुंद

गर्दीच्या वेळी नियंत्रणाचा अभाव…

रात्री अपुरी प्रकाशयोजना..!

स्थानिकांच्या मते, सकाळी शाळा व कार्यालयीन वेळेत तसेच संध्याकाळी बाजारपेठेच्या गर्दीत परिस्थिती अधिक गंभीर बनते. शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याची तक्रार आहे.

संभाव्य परिणाम….!

वाहतूक तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारे सेवा मार्गावर जड वाहनांची रांग लागल्यास ..

समोरासमोर धडक होण्याचा धोका वाढतो…!

आपत्कालीन सेवा (रुग्णवाहिका, अग्निशमन) अडकू शकतात…!

वाहतुकीचा संपूर्ण ताळमेळ बिघडतो

स्थानिक अपघातप्रवण क्षेत्र तयार होते…!

नागरिकांच्या प्रमुख मागण्या..!

सर्विस रोडवर मालवाहू वाहनांच्या पार्किंगवर तात्काळ बंदी

‘नो पार्किंग झोन’ घोषित करणे

वाहतूक पोलिसांची नियमित गस्त

सीसीटीव्ही बसविणे

वेगमर्यादा फलक व स्पीड ब्रेकर उभारणे

संयुक्त पाहणी करून कायमस्वरूपी आराखडा जाहीर करणे

दरम्यान, प्रशासन व वाहतूक विभागाने तातडीने कारवाई करावी, अन्यथा मोठा अपघात घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गंभीर दुर्घटना घडण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
भाजयुमो प्रदेश सचिव तथा जनसेवक इम्रान खान यांनीही सर्विस रोडवरील अनधिकृत मालवाहू वाहनांची पार्किंग तात्काळ हटवून नागरिकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य द्यावे, अशी मागणी केली आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!