Tuesday, July 28, 2026
Homeभद्रावतीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भद्रावतीत रक्तदानाचा महासंकल्प; आमदार करण देवतळे यांच्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भद्रावतीत रक्तदानाचा महासंकल्प; आमदार करण देवतळे यांच्या नेतृत्वाखाली भव्य रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

भद्रावती, न्यूज डेस्क

Shankar Borghare,

95 25 61 25 55

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त भद्रावती शहरात समाजसेवेचा आदर्श घालून देत आमदार करण संजय देवतळे यांच्या नेतृत्वाखाली भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. “रक्तदान हीच जनसेवा, चालवा मानवतेची ईश्वरसेवा” या संकल्पनेतून आयोजित या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

राजकीय उत्सवापेक्षा समाजहिताला प्राधान्य देण्याचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात मोठ्या प्रमाणावर रक्तसंकलन करण्यात आले. अपघातग्रस्त, गंभीर आजारांवरील रुग्ण तसेच रक्ताची गरज असलेल्या गरजूंसाठी हा उपक्रम जीवनदायी ठरणार असून, रक्तदानाबाबत जनजागृती करण्याचाही महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.

यावेळी माजी नगराध्यक्ष संजय वासेकर, सभापती वृषाली पांढरे, माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, भाजयुमो अध्यक्ष विशाल ठेंगणे, अमित गुंडावार, गोपाल गोसवाडे, अनंता ताटे, पिंपळकर, निशांत देवगडे, नगरसेविका कविता सावनकर, माधुरी ढगे, लता इंदुरकर, सुषमाताई शिंदे, डॉ. बाला अनंता मांढरे, बबलू सय्यद, माजी नगरसेवक सत्तारभाई, कृषी उत्पन्न बाजार समितीचे राजू डोंगे, प्रवीण महाजन, स्वीय सहाय्यक प्रणव थेटे, करण मत्ते यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

यावेळी आमदार करण देवतळे यांनी रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याचे सांगत प्रत्येक निरोगी नागरिकाने नियमित रक्तदान करून समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या रक्तदान शिबिराने सेवा, संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकीचा प्रभावी संदेश दिला. समाजोपयोगी कार्यातून वाढदिवस साजरा करण्याचा आदर्श या उपक्रमातून पुन्हा स्पष्ट झाला.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!